‘हा’ ठरला देशातील पहिला ‘सेफ्टी फर्स्ट’ मॉल

नवी मुंबई :
नेक्सस मॉलच्या वतीने त्यांच्या ‘सेफ्टी फर्स्ट’ प्रोग्राम/इनिशिएटिव्हकरिता जगातील सर्वात प्रतिष्ठीत सर्टीफिकेशन ऑर्गनायजेशन ‘ब्युरो वेरीटाज’समवेत हातमिळवणी केली. ‘सेफ्टी फर्स्ट’चे उद्दिष्ट हे डब्ल्यूएचओ/ स्थानिक प्रशासनाने नेमून दिलेल्या आरोग्य आणि सुरक्षा शिफारसींचे तंतोतंत पालन करण्याचे आहे. 140 देशांमध्ये 190 हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या वैश्विक चाचणी, तपासणी आणि प्रमाणन मंडळाकडून थर्ड पार्टी खातरजमा करण्यात आलेला, नेक्सस मॉल्स भारतातील पहिला मॉल मंच ठरला. सीवूड ग्रँड सेंट्रल हा नेक्सस मॉलचा भाग असून हे ब्युरो वेरीटाजसोबत भागीदारी करून सेफ्टी फर्स्टचा शुभारंभ करणारे पहिले मॉल ठरणार आहे. याद्वारे गुणवत्तेची फेरखात्री मिळणार असून ग्राहकांना सुरक्षित शॉपिंग अनुभव मिळणार आहे.
नेक्सस मॉलच्या पोर्टफोलियोत जास्तीत-जास्त स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण राखणारा ‘सेफ्टी फर्स्ट’ प्रोग्राम/इनिशिएटिव्ह हा कोविड – 19 पश्चात ‘नव्याने सामान्य’(न्यू नॉर्मल)पणे मॉल सुरू करताना शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया / डब्ल्यूएचओद्वारे जारी काटेकोर एसओपींची अंमलबजावणी करणार आहे. ब्युरो वेरीटाज’द्वारे अधिकाधिक स्वच्छता, संसर्गरहित सुविधा आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे सध्या नेक्सस मॉल्स पोर्टफोलियो अंतर्गत येणाऱ्या सर्व नऊ मॉल्सच्या कार्यान्वित प्रक्रियेचे सविस्तर प्रोटोकॉल आणि उपाययोजना यांची पुनर्खात्री तसेच पडताळणी करण्यात येणार आहे.

‘आता विद्यार्थी, शिक्षकांनी व्हावे तंत्रकुशल’

‘सेफ्टी फर्स्ट’ विषयी बोलताना नेक्सस मॉल्सचे सीईओ दलीप सेहगल म्हणाले की, “न्यू नॉर्मलदरम्यान आमच्या मॉलमध्ये हजारो व्यक्ती येणार आहेत. त्यावेळी सुरक्षा अग्रस्थानी असणार आहे.     ती हा आनंद फिरेल. या प्रोग्राम अंतर्गत आम्ही खातरजमा करू की, नेक्सस मॉलच्या नऊ पोर्टफोलियोत आमच्याशी निगडीत सर्वच घटक, विक्रेते आणि कर्मचारी वर्गाचे परिसरात स्वागत करताना स्थानिक प्रशासनाच्या सल्ल्यानुसार सर्व सुरक्षित उपाययोजनांचे पालन करण्यात येईल. आमची ब्युरो वेरीटाज’समवेत हातमिळवणी म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेकडून करण्यात आलेली फेरखातरजमा आहे. त्यांना आरोग्य आणि स्वच्छता विषयक निकषांसंदर्भात जगभराचा दशकांचा अनुभव आहे.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here