आज कळणार ‘आत्मनिर्भर भारत’चा तपशील…

नवी दिल्ली :
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देणार आहेत. संध्याकाळी ४ वाजता त्या पत्रकार परिषद घेतील. स्वावलंबी भारत पॅकेजमधून कोणत्या क्षेत्राला काय मिळणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.
nirmla sitaramn, aatmnirbhar
२० लाख कोटींचे ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेज
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, देशाला स्वावलंबी करण्यासाठी काल मोदींनी स्वावलंबी भारत पॅकेजची घोषणा केली. अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला पॅकेजमधून दिलासा मिळेल, असा विश्वास मोदींनी बोलून दाखवला. या पॅकेजची माहिती अर्थमंत्री उद्या देतील, असं मोदींनी म्हटलं होतं. आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती देणार आहेत. मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजची माहिती दोन-तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार असल्याचं अर्थ मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार संजीव सन्याल यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here