नवी दिल्ली:
निसान इंडियाने आज आपल्या बहुचर्चित बी-एसयूव्हीच्या कन्सेप्ट व्हर्जनचे अनावरण केले. निसान मॅग्नाइट असे नामकरण केलेली ही तंत्रज्ञान समृद्ध आणि शैलीदार बी-एसयूव्ही २०२० या आर्थिक वर्षात भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. “मॅग्नेटिक” आणि “इग्नाइट” या दोन शब्दांच्या संयोगातून मॅग्नाइट असे नामकरण करण्यात आले आहे.
५० टक्के ईएमआयमध्ये घेऊन ‘जावा’
“निसान मॅग्नाइट” ही निसानच्या जागतिक एसयूव्ही डीएनएच्या उत्क्रांतीमधील पुढील झेप आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या श्रेणीचे चित्र पालटणारे हे वाहन असेल. चार मीटर लांबीच्या आतील वाहन श्रेणीतील अशा प्रकारच्या धाडसी वाहनामुळे निसान मॅग्नाइट ही बी-एसयूव्ही श्रेणीची व्याख्याच बदलून टाकेल, असा आम्हाला विश्वास आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या तत्त्वज्ञानानुसार निसान मॅग्नाइट तयार करण्यात आली असून भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन जपानमध्ये याची संरचना करण्यात आली आहे,” असे निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…