‘निसान’ने सादर केली बी-एसयूव्ही

नवी दिल्ली :
निसान इंडियाने आज आपल्या बी-एसयूव्ही कन्सेप्टचे हेडलाइट्स आणि ग्रिल यांची झलक पेश केली. कंपनीच्या जागतिक मुख्यालयात १६ जुलै २०२० रोजी बी–एसयूव्ही कन्सेप्टचे जगासमोर प्रथमच अनावरण होणार आहे.
भारतीय बाजारपेठेसाठीच्या कंपनीच्या या पहिल्याच काँपॅक्ट बी–एसयूव्हीमध्ये ब्रेकथ्रू उत्पादने आणि तंत्रज्ञानाने लोकांना सक्षम करणे हे निसानचे तत्त्वज्ञान ओतप्रोत भरलेले आहे. आर्थिक वर्ष २०२०–२१च्या दुसऱ्या सहामाहीत ही काँपॅक्ट बी–एसयूव्ही बाजारपेठेत दाखल करण्याचे नियोजन आहे.
निसानच्या एसयूव्हीचा जागतिक वारसा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी ही नवी काँपॅक्ट एसयूव्ही अत्यंत मजबूत, दमदार कामगिरीसह डायनॅमिक रोड प्रेझेन्ससाठी शैलीदार डिझाइनसह विविध वैशिष्ट्यांनी युक्त अशी उद्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे. निसानच्या या नव्या एसयूव्हीमध्ये निसान इंटलिजंट मोबिलिटीचा भाग म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून वाहने कशा प्रकारे ताकदवान असली पाहिजेत, कशी चालवली गेली पाहिजेत आणि समाजात एकरूप झाली पाहिजेत, या निसानच्या ध्येयाशी सुसंगत अशी तिची रचना आहे.

१५ जुलैपर्यंत ‘नो टेक ऑफ’

सातत्यपूर्ण कल्पक संशोधन आणि जपानी अभियांत्रिकीची कमाल या निसानच्या जागतिक एसयूव्हीच्या डीएनएतून आकाराला आलेली बी–एसयूव्ही पॅट्रोल, पाथफाइंडर, आर्माडा, एक्स–ट्रेल, ज्यूक, कशकाई आणि किक्स या निसानच्या आयकॉनिक मॉडेल्सच्या संपन्न वारशात भर घालणारी आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here