नवी दिल्ली :
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा हुकूमशहा किम जोंग उन (kim jong un) यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त काही अमेरिकी माध्यमांनी दिले आहे. दक्षिण कोरियाकडून या संदर्भातील वृत्तांची माहिती घेण्यात येत आहे. या वृत्ताला अधिकृतपणे कोणताही दुजोरा मिळालेला नाही.काही अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन (kim jong un) यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती, पण त्यानंतर त्यांची तब्येत खालावली.
दरम्यान, डेली एनके या माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांची तब्येत आता सुधारत आहे. त्यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आली. पण आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.उत्तर कोरियाचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे आणि किमचे आजोबा किम इल संग यांच्या जयंतीनिमित्त १५ एप्रिलला आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाला किम जोंग उन (kim jong un) अनुपस्थित राहिले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी देशात आणि त्याचवेळी जगभरात चर्चेला सुरुवात झाली होती.
https://thebusinesstimes.in/china-1000-companies-ready-to-come-to-india/
अती धुम्रपान आले kim jong un च्या अंगाशी ?
दक्षिण कोरियाने सोमवारी म्हटले आहे की, किमवर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया या महिन्याच्या सुरुवातीलाच करण्यात आली आहे. तर उत्तर कोरियाच्या डेली एनके या वृत्त संस्थेला एका अज्ञात अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार किम जोंग उन यांना गेल्या ऑगस्टपासूनच हृदयविकाराचा त्रास जाणवत होता. मात्र, माऊंट पैक्तूला वारंवार भेट दिल्याने हा त्रास वाढला.
किम जोंग उनमध्ये लठ्ठपणा, तणाव आणि अती धुम्रपान करत असल्याने हृदयविकार बळावला. उत्तर कोरियाने नुकतेच देशात एकही कोरोनाचा पेशंट नसल्याचा दावा केला होता. केवळ तीन रुग्ण होते, मात्र ते देखील बरे झाल्याचा दावा केला केला होता. फेब्रुवारीमध्येच कोरियाने सीमा बंद केल्या होत्या.
दुसऱ्या एका रिपोर्टनुसार हँगसन येथील माऊंट कुमगँग हॉस्पिटलमध्ये किमवर १२ एप्रिललाच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून तेथीलच बंगल्यामध्ये पुढील उपचार सुरु आहेत.
https://cinenama.in/2020/04/21/grammys-winner-will-be-in-earthday-concert/