​पेटीएम फर्स्ट गेम्सवर ​आता बक्षिसे जिंकण्याची संधी

paytm first game


मुंबई​ :
पेटीएम फर्स्ट गेम्स (paytm first games)आता दर महिन्याला आपल्या यूझर्सना बक्षीस आणि रोख रक्कम देत आहे. ऑनलाइन गेम खेळून पैसे कमावण्याकरिता हे एक ‘गो टू अॅप’च्या स्वरुपात उदयास येत आहे. पेटीएम फर्स्ट गेम्समध्ये लूडो, रम्मी, टिक टॅक टो, ब्रेक द बॅक, फँटसी फुटबॉल आणि फँटसी क्रिकेटसह ३०० पेक्षा जास्त गेम्स उपलब्ध आहेत. यूझर्सना घरी बसून बक्षीस आणि पैसा कमावण्याची संधी याद्वारे मिळते. काही बक्षीसं तर थेट यूझरच्या पेटीएम वॉलेट किंवा काही मिनिटात ​त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात.
Paytm First Games
व्हॉट्सअपवर देखील दिसणार जाहिराती?

दररोज एक लाखाहून अधिक लोक या paytm first games प्लॅटफॉर्मवर जॉइन होत असल्याचा कंपनीचा दावा असून, अॅपचा इंटरफेस बराचसा यूझरफ्रेंडली आहे. होम स्क्रीनच्या टॉप राइटवर बॅलेन्स आयकॉनवर टॅप करुन ‘अॅड मनी’ पर्याय निवडून पैसे टाकता येतात. हवी ती रक्कम यूझरच्या आवडत्या पेमेंट मोडच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाऊ शकते. यात पेटीएम वॉलेट, नेट बँकिंग आणि क्रेडिट/ डेबिट कार्डचा समावेश आहे. ​आजवर हे ऍप देशातील सुमारे ​५ दशलक्षांपेक्षा ​मोबाईलफोनमध्ये डाउनलोड​ झाले आहे. यात बबल शूटर, बाइक रेसिंग, बास्केटबॉल हीरो ८ बॉल पूल आणि जेली क्रशसारखे कॅज्युअल गेम्स मोफत खेळता येतात. यांचे नुकतेच ई स्पोर्ट्स चॅलेंज ‘क्लॅश रॉयल’ मध्ये टूर्नामेंटसाठी ११ हजारांपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झाले. भारतातील विविध भागांतील स्पर्धकांनी ४ लाख रुपयांची बक्षीसं जिंकण्यासाठी ही स्पर्धा खेळली. ​ 
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here