ईपेलेटरही करणार आता घरपोच डिलिव्हरी 

home delivery

मुंबई :
लॉकडाऊनमुळे सगळेच स्थानबद्ध झाल्यामुळे आता बहुतांश व्यावसायिकांनी आपल्या मूळ व्यवसायामध्ये बदल करत नागरिकांना घरपोच साहित्य (home delivery) देण्याच्या उदयॊगामध्ये प्रवेश केला आहे. या काळात आपला व्यवसाय टिकवून ठेवायचा असेल तर त्यांना त्यावाचून दुसरा पर्याय देखील समोर नसल्याचे दिसत आहे. ​डिजिटल क्रेडिट स्पेसमधील इनोव्हेटर असलेल्या ईपेलेटरने देखील झिपग्रिड या तंत्रज्ञान प्रणित सर्व्हिस प्रोव्हायडरशी भागीदारी केली आहे. यातून उदयास आलेल्या झिपमार्टच्या माध्यमातून घरोघरी आवश्यक वस्तू वितरीत  (home delivery) करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. साथीच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डरद्वारे मागवलेल्या वस्तूंची कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी निवडक निवासी सोसायट्यांमध्ये करणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे. ही सेवा आता कार्यान्वित झाली असून मुंबई आणि एनसीआरमधील झिपग्रिडमध्ये नोंदणीकृत सर्व निवासी सोसायटीसाठी उपलब्ध आहे.
home delivery
काय करणार जिओ, फेसबुकच्या गुंतवणूकीचे?

झिपमार्ट हे ईपेलेटरच्या भागीदारीतून स्टोअर्समधील खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंचे वर्गीकरण करते. ईपेलेटर आणि झिपग्रिडच्या एकत्रित कॉमर्स अॅक्टिव्हिटिजमुळे ग्राहकांना घरातूनच सुरक्षितरित्या वस्तूंची ऑर्डर करता येते. तसेच संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधाही देण्यात आली आहे. झिपग्रिडवरील नोंदणीकृत हौसिंग सोसायटी, बिल्डिंग हे झिपपमार्ट टॅबअंतर्गत झिपग्रिड अॅपवरील ईपेलेटरवरील ऑनलाइन पोर्टलवर किराणाची ऑर्डर देऊ शकतात. ही सेवा अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्म या दोन्हीवर उपलब्ध आहे. एकदा ऑर्डर प्लेस केल्यानंतर ग्राहकांना सरकारी आदेशानुसार सर्व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करत एक्झिक्युटिव्हद्वारे ग्राहकांच्या दारात वस्तू (home delivery) आणून दिल्या जातात. ईपेलेटरचे सहसंस्थापक उदय सोमयजुला म्हणाले, ‘ग्राहकांनी सुरक्षित वातावरणात म्हणजेच त्यांच्या घरातून आवश्यक वस्तूंची ऑर्डर द्यावी आणि आम्ही त्यांना दारापर्यंत ती पोहोचती करावी, हा या संयुक्त भागीदारीमागील हेतू आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी तसेच समाजाला अधिक सक्षम करण्यात योगदान देण्यासाठी आम्ही ही भागीदारी केली आहे.’​


अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here