आता ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’

नवी दिल्ली :
देशातल्या प्रत्येक राज्यात वन-नेशन वन रेशन कार्ड योजना लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. आज झालेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि घोषणा केली. या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही योजना लागू झाल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्ड धारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

आत्मनिर्भर भारत : MSMEना केंद्राचा मोठा दिलासा
nirmla sitaramn, aatmnirbhar
‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही मोदी सरकारची महत्त्वांकाक्षी योजना आहे. ही योजना लागू झाल्यानंतर कोणताही रेशनकार्डधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही राज्यातल्या रेशन डेपोवरुन धान्य घेऊ शकतो. समजा एखादा माणूस महाराष्ट्रात कामगार म्हणून आला आहे. तो परप्रांतीय आहे. तर ही योजना लागू झाल्यानंतर त्याला महाराष्ट्रातल्या रेशन दुकानातही तेच कार्ड दाखवून रेशन मिळू शकणार आहे. या योजनेनुसार लाभार्थ्यांची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसद्वारे केली जाऊ शकते.  

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here