आता विमान तिकीट रद्द करा मोफत

liberty

मुंबई :
लिबर्टी जनरल इन्शुरन्स लि.च्यावतीने फ्लिपकार्टवर ‘लिबर्टी सिक्योर ट्रॅव्हल’ सुरू करण्यात आले आहे. यानुसार फ्लिपकार्टच्या फ्लाइट प्लॅटफॉर्मवरुन एअरलाईन्स बुक करणार्‍या ग्राहकांसाठी विशेष विमा पॉलिसी मिळणार असून, ग्राहक नाममात्र रक्कम देऊन झिरो कॅन्सलेशनची निवड करू शकतात, अशा प्रकारे त्यांची उड्डाणे रद्द केल्यावर पूर्ण परतावा मिळवू शकणार आहेत. या नवीन पॉलिसी अंतर्गत  ग्राहकांना तिकीट बूकिंग रद्द करण्यासाठी कोणतेही दंड होणार नाही,  ज्यामुळे त्यांची रद्दबातल चिंता कमी होईल. लिबर्टी सिक्योर ट्रॅव्हल ग्राहकांना ‘कारणास्तव रद्द करा’ पर्याय ऑफर करते. या करणांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती,  प्रयोजनांमध्ये बदल आणि इतर वैयक्तिक कामे यासारखे कारण आणि शक्यतांचा समावेश असू शकतो. या पॉलिसी अंतर्गत ग्राहकांना विमान सुटण्यापूर्वी 24 तासांपर्यंत त्यांची उड्डाणे रद्द करण्यास परवानगी असेल आणि लिबर्टी त्यांना 5000 रुपयापर्यंतच्या नुकसानीची भरपाई करेल.
या विषयी बोलताना लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे सीईओ आणि होल टाईम डायरेक्टर रूपम अस्थाना म्हणाले, “फ्लिपकार्टबरोबर प्रवास विमा उतरविण्याची संधि देण्यासाठी आम्ही खूष आहोत. या संबंधामुळे भारतीय ग्राहकांना खूप लाभ मिळणार असून यात ग्राहक-केंद्रीकरणाच्या मापदंडावर चांगले गुण मिळविणारे ट्रॅव्हल इन्शुरन्स उत्पादन खरेदी करण्यास ग्राहकांना सक्षम बनविण्याची क्षमता आहे. जस जसे आपले जीवन पूर्वपदावर येईल, तसे या उत्पादनामुळे मोठ्या संख्येने स्थानिक प्रवाश्यांना फायदा होईल आणि कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीमुळे होणारे नुकसान कमी होईल. आम्हाला विश्वास आहे की आमचे उत्पादन कोणतीही चिंता न करता ग्राहकांना त्यांच्या प्रवासाची योजना आखण्याचा आत्मविश्वास देईल. ”
सब ब्रोकर कसे बनाल?
liberty
अस्थाना पुढे म्हणाले की, “ही संघटना आम्हाला या नवीन युगातील डिजिटल व्यासपीठावर आमचा वितरण आधार वाढविण्यास मदत करणार नाही तर फ्लिपकार्टच्या ग्राहकांना संबंधित प्रवासाची सोल्यूशन्स उपलब्ध करून देऊन क्लास सर्व्हिसेसमध्ये सर्वोत्कृष्ट ऑफर करण्यास सक्षम करेल.”
या ऑफरबद्दल बोलताना, फ्लिपकार्ट येथील ग्रोथ आणि मोनेटायजेशनचे  उपाध्यक्ष प्रकाश सिकेरिया म्हणाले, “फ्लिपकार्ट येथे आमचा दृष्टीकोन नेहमी ग्राहक-प्रथम असा राहिला आहे आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्सबरोबरची आमची भागीदारी या पॉलिसीच्या अनुरुप आहे. आम्ही एक विवेकी दृष्टिकोन सुनिश्चित करून सर्वोत्तम विमा पर्याय देऊन हवाई प्रवाश्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार बुकिंग करण्यास सक्षम करतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here