आता करा ऑनलाईन मोटारसायकल खरेदी

मुंबई :
कोरोना काळात सगळेचजण ऑनलाईन गेल्यामुळे आता मोटारसायकल विक्रेतेदेखील ऑनलाईन विक्री करण्यासाठी प्रवृत्त झाल्या आहेत. त्यानुसार आता हिरो मोटोकॉर्पने ऑनलाइन विक्री करणारे ‘ईशॉप’  सुरु केले आहे. या ईशॉपमध्ये खरेदीसंबंधित माहिती व प्रक्रिया यंत्रणेमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आल्‍या आहेत. ज्‍यामुळे ग्राहकांना सुलभपणे व पारदर्शकरित्‍या थेट कंपनीच्‍या वेबसाइटवरून त्‍यांच्‍या आवडीची मोटरसायकल किंवा स्‍कूटर खरेदी करता येणार आहे.     
यासाठी ग्राहक कंपनीच्‍या अधिकृत वेबसाइटला (www.heromotocorp.com) भेट देऊन होमपेजवर टॅब करण्‍याच्‍या माध्‍यमातून ईशॉपची सुविधा प्राप्‍त करू शकतात. हे होमपेज त्‍यांना ऑनलाइन खरेदी/बुंकिंग माध्‍यमाकडे घेऊन जाईल. 
यामध्ये ग्राहकांना निर्णय घेणे, वाहन खरेदी करणे, डिलिव्‍हरी घेणे अशा संबंधित प्रक्रियांदरम्‍यान मार्गदर्शन होणार असून, नवीन ऑन-रोड किंमत, लाइव्‍ह स्‍टॉक स्‍टेटस्, ऑनलाइन डॉक्‍युमेंट सबमिशन, इन्‍स्‍टण्‍ट डिलर इन्टिमेशन, फायनान्‍स पर्याय, सेल्‍ड ऑर्डर प्रीव्‍ह्यू व कन्‍फर्मेशन, व्‍हीआयएन अलोकेशन व डिलिव्‍हरी यासंदर्भात देखील माहिती मिळणार आहे. 
ईलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ दोन कंपन्या आल्या एकत्र

पेजवर ग्राहकाने उत्‍पादन, व्‍हेरिएण्‍ट, रंग व शहराची निवड केल्‍यानंतर यंत्रणा डिलरशिपची यादी व एसकेयू उपलब्‍धता दाखवते. ग्राहक त्‍यांच्‍या सोयीनुसार डिलरशिपची निवड करून पेमेण्‍ट करू शकतात. एक्‍स-शोरूम व ऑन-रोड अशा दोन्‍ही किंमती होणा-या खर्चांसह सादर केल्‍या जातील. 
पेमेण्‍ट केल्‍यानंतर ग्राहकाला सत्‍यापनासाठी युनिक ओटीपी क्रमांकासह ई-रिसीट देण्‍यात येते. यंत्रणेमध्‍ये सत्‍यापन पूर्ण केल्‍यानंतर निवडण्‍यात आलेला डिलर सेल्‍स असिस्‍टण्‍ट नियुक्‍त करतो. ग्राहकाला पाहिजे असल्‍यास पेमेण्‍ट प्रक्रियेदरम्‍यान रिटेल फायनान्‍स सुविधा देखील देण्‍यात येते. सेल्‍स असिस्‍टण्‍ट ग्राहकांच्‍या सर्व चौकशीचे निराकरण करतो आणि त्‍यांना कागदपत्रे व्‍यवहार, फायनान्‍स, इनवॉईसिंग, विमा, नोंदणी आणि डिलिव्‍हरी (पर्यायी होम डिलिव्‍हरी) अशा उर्वरित पाय-यांदरम्‍यान मार्गदर्शन करतो.
ऑर्डर तयार झाल्‍यानंतर ग्राहकाला एसएमएसच्‍या माध्‍यमातून एक लिंक पाठवण्‍यात येते. ही लिंक त्‍याला/तिला थेट डॉक्‍युमेंट अपलोडिंग विभागाकडे घेऊन जाते. सत्‍यापन झाल्‍यानंतर विक्री ऑर्डरची माहिती ग्राहकाला पाठवली जाते आणि ग्राहकाकडून मंजूरी मिळाल्‍यानंतर इनवॉईस तयार केले जाते, डीलरकडून नोंदणीसाठी अर्ज केला जातो आणि ग्राहकाने निवडलेल्‍या ठिकाणी वाहन डिलिव्‍हर केले जाते. डिलिव्‍हरीदरम्‍यान आरटीओकडे देणे आवश्‍यक असलेली स्‍वाक्षरीकृत कागदपत्रे ग्राहकाकडून गोळा केली जातात. 
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here