‘ऑफलाईन’ दुकानदार आता गोदरेजसोबत ‘ऑनलाईन’

मुंबई :
गोदरेज अप्लायन्सेसने आपल्या ‘ऑफलाइन’ व्यावसायिक भागीदारांना ‘ऑनलाइन’ स्वरुपात व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे देशभरातील ग्राहकांची मानसिकता, त्यांचे वर्तन बदलत आहे. त्यामुऴे खरेदीच्या संपूर्ण प्रक्रियेत, ग्राहकाची सुरक्षा व त्याचे आरोग्य यांना अनन्यसाधारण महत्त्व देऊन त्या अनुषंगाने संपूर्ण पारिस्थितिक व्यवस्थेमध्ये परिवर्तन आणण्याची गरज निर्माण झाली आहे. छोट्या दुकानांचे मालक या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ऑनलाईन व्यवसायाचा प्रश्न येतो, तेव्हा या छोट्या दुकानदारांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यातून ग्राहक, व्यावसायिक भागीदार आणि कंपन्या या सर्वांनाच लाभ होईल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा ‘गोदरेज’चा मानस आहे. कंपनीच्या वतीने ग्राहकांशी संवाद साधणारा व्यावसायिक भागीदार हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यांना ऑनलाइन व्यवसाय करण्यास मदत करण्यातून ग्राहकांची सुरक्षा, व्यापाराची सुरक्षा आणि एकूणच व्यापारात सुधारणा घडवून आणता येईल.
फेडरल बँक ‘सीएसआर’ घरांचे हस्तांतरण

गोदरेज आपल्या व्यावसायिक भागीदारांना ‘गूगल माय बिझनेस’वर नोंदणी करण्यास मदत करीत आहे, त्याशिवाय डिजिटल अस्तित्व निर्माण करण्यासाठी ‘फेसबुक बिझनेस पेज’ बनविण्यात ‘ऑफलाईन’ दुकानदारांना सहाय्य करीत आहे. गोदरेज ब्रॅंडच्या एकूण 25 हजार ऑफलाईन दुकानदारांना ‘फेसबुक बिझनेस पेज’ तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यापैकी 2300 जणांनी ते तयार केले असून दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. ग्राहकांनासुद्धा या डिजिटल व्यवस्थेमुळे उत्पादनांची संपूर्ण माहिती मिळेल व त्यांच्या ओळखीच्या, स्थानिक रिटेल दुकानातून वस्तू घेणे सुलभ होईल. ‘गोदरेज’ची सर्व ‘एक्सक्लुझिव्ह ब्रॅंड आउटलेट्स’, निवडक रिटेल भागीदार आणि ‘गोदरेज ग्रीन एसी हब’ यांची नोंदणी फेसबुकवर झाली असून त्यांची ‘शॉप पेजेस’ही निर्माण झालेली आहेत. यामुळे त्यांना ग्राहकांशी ‘व्हॉट्सअप’च्या माध्यमातून जोडले जाऊन चर्चा, वाटाघाटी व खरेदीचा व्यवहार पूर्ण करता येत आहे. 

ग्राहकांना घरात आरामात बसून उपकरणांची खरेदी करणे सोईचे जावे, याकरीता ‘गोदरेज अप्लायन्सेस’ने ‘व्हिडीओ’आधारीत दूरस्थ विक्री उपक्रम नव्याने सुरू केला आहे. या उपक्रमाला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत, ‘ब्रँड’च्या दुकानातील विक्रेते व्हिडिओ कॉलद्वारे ग्राहकांना ‘लाइव्ह डेमो’च्या माध्यमातून उत्पादने दाखवतात आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार पैसे भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून देतात.
‘गोदरेज’ने ‘ऑनलाईन ट्रेड एंगेजमेंट’ कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेतला आहे. यामध्ये आपल्या 5 हजार व्यावसायिक भागीदारांना उद्योगाचे बदलते स्वरूप, ग्राहकांची वेगाने बदलणारी मानसिकता याविषयी माहिती देऊन यापुढील काळात स्वतःला कसे घडवावे, डिजिटल परिवर्तनाची कास कशी धरावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘गोदरेज ब्रँड’ने ग्राहकांना पैसे भरण्यासाठी अनेक पर्याय देणारी ‘पाईन लॅब्ज’ची ‘इपीओएस’ प्रणाली स्वीकारली आहे, तर ग्राहक व रिटेलर या दोघांनाही सहजपणे डिजिटल पद्धतीने पेमेंट ज्यातून करता येईल, अशा ‘बीनाऊ’ या ‘इएमआय टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म’शी सहयोग केला आहे. अ‍ॅमेझॉन’सारख्या प्लॅटफॉर्मवरही गोदरेज ब्रॅंडची नोंदणी करण्यात येत आहे. मध्यम व लहान शहरांमध्ये ‘अ‍ॅमेझॉन’ची सेवा उपलब्ध असल्याने, तसेच ‘एक्सक्लुझिव्ह बिझनेस आउटलेट्स’ना ऑनलाईन व्यवहार करणे यातून सोयीचे होणार असल्याने डिजिटल लाटेचा फायदा घेणे व दोन्ही प्रकारांनी विक्री वाढवणे हे यातून साध्य करण्यात येत आहे.
‘गोदरेज अप्लायन्सेस’चे व्यवसाय प्रमुख व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, ‘’व्यावसायिक भागीदारांना आमच्या व्यवसाय व्यवस्थेत मोठे महत्त्व आहे. आगामी काळात डिजिटल पद्धतीने व्यवहार अधिक प्रमाणात होणार असल्याचे लक्षात घेऊन या भागीदारांना आम्ही नव्या व्यवस्थेसाठी सज्ज करीत आहोत. डिजिटल उद्योग क्षेत्रातील काही दिग्गजांशी आम्ही हातमिळवणी करीत आहोत ‘ऑफलाइन’ व ‘ऑनलाइन’ या दोन्ही पद्धतींची एकात्मता यापुढील काळात साधणार आहोत. यातून विक्रीची एक नवीनच पद्धत विकसीत होईल आणि पारिस्थितिक व्यवस्थेमध्ये दीर्घकालीन कार्यक्षमता वाढीस लागेल.’’ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here