ओप्पो देणार ‘अमर्याद अनुभव’

पणजी :
ग्राहकांना ‘सेन्स द इन्फिनाइट’ म्हणजेच अमर्याद अनुभव देण्यासाठी ओप्पो या आघाडीच्या स्मार्ट डिव्हाइस ब्रँडने आज भारतात ओप्पो Reno4 प्रो आणि ओप्पो वॉच सीरिज सादर केली.
ओप्पो Reno4 प्रो 34990 रु. आणि ओप्पो वॉच सीरिज 46 मिमी. 19990 रु. आणि 41 मिमी. 14990 रु. अशा आकर्षक किमतीला उपलब्ध आहे. प्रीमिअम डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या Reno4 प्रोने तरुणांची आवड ओळखत आपल्या 90Hz 3D बॉर्डरलेस सेन्स स्क्रीन आणि 65W SuperVOOC 2.0 सह स्थान मिळवले आहे. या विभागात प्रीमिअम अनुभव 34990 रु. उपलब्ध असणारा Reno4 प्रो हा भारतातील पहिला 90Hz 3D कर्व्हड् डिस्प्ले असलेला फोन आहे. अत्यंत सहजसुंदर, प्रीमिअम आणि समृद्ध अनुभ देण्याच्या दृष्टीनेच खास या स्मार्टफोनची रचना करण्यात आली आहे. वापरकर्त्याला आपल्या सर्जनशील अभिव्यक्तीला सक्षम करण्याचा अनुभव मिळावा यासाठी नाविन्यपूर्ण इमेजिंग वैशिष्ट्ये असलेल्या रेनो सीरिजचा हा वारसा Reno4 प्रोने पुढे नेला आहे. Reno4 प्रो आणि त्यातील अतुलनीय परफॉर्मन्स यामुळे वापरकर्त्यांना ‘सेन्स इन इन्फिनाइट’ शक्यतांचा अनुभव नक्कीच मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.
ड्युएल-कव्हर्ड् AMOLED डिस्प्ले असलेला जगातील पहिला स्मार्टवॉर्च म्हणजे ओप्पो वॉच स्टायलिश, बहुआयामी आणि सखोल अनुभव देणारा आहे. ग्राहकांच्या स्टाइलमध्ये भर घालणारा हा त्यांचा एक सुयोग्य साथीदार आहे. तसेच गुगलTM अॅप्स आणि सेवांसह व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात सहज वावरण्यासाठी हे एक सुयोग्य साधन आहे.

या सादरीकरणाबद्दल ओप्पो इंडियाचे अध्यक्ष एल्विस झोऊ म्हणाले, “ओप्पो Reno4 प्रो आणि ओप्पो वॉच सादर होणारी भारत ही जगातील आमची पहिली बाजारपेठ ठरली आहे. अतुलनीय आकर्षक स्क्रीन, कमालीचे वेगवान चार्जिंग आणि नाविन्यपूर्ण इमेजिंग वैशिष्ट्ये या आमच्या ग्राहकांच्या गरजा ही दोन्ही उत्पादने उत्कृष्टरित्या पूर्ण करतात. आज सादर झालेली आमची ही उत्पादने आमच्या वापरकर्त्यांना एक परिपूर्ण अनुभव देतील आणि त्यांना अभिव्यक्तीसाठी ‘सेन्स इ इन्फिनाइट’ शक्यता देऊ करताना एक संलग्न परिसंस्था उभारतील, याची आम्हाला खात्री आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here