‘ओयो’ने सुरु केले आता ‘सॅनिटाईज स्टे’

नवी दिल्‍ली : 
कोविड-१९ महामारीने ग्राहकांच्‍या वर्तणूकीमध्‍ये विशेषत: प्रवास व आदरातिथ्‍यासंदर्भात वर्तणूकीमध्‍ये मोठा बदल घडवून आणला आहे. उच्‍च आरोग्‍यदायी दर्जा, किमान संपर्क होण्‍याची खात्री देणारी सेवा आणि सुधारित विश्‍वसनीयता या ग्राहकांच्‍या लॉकडाऊननंतर प्रवास नियोजनासाठी उच्‍च मागण्‍या आहेत. ओयो ही जगातील आघाडीची हॉटेल शृंखला परिणाम कमी करण्‍यासाठी, तसेच उत्तम दर्जाचा प्रवास व आदरातिथ्‍य अनुभवाची पूर्तता करण्‍याकरिता आणि सध्‍याच्‍या ‘न्‍यू नॉर्मल’ स्थितींमध्‍ये कार्यसंचालन सुरू ठेवण्‍याकरिता नाविन्‍यता आणण्‍यासाठी विविध उपाय व उपक्रम हाती घेत आहे.
यामध्‍ये लॉकडाऊननंतरच्‍या आदरातिथ्‍य विभागामधील आव्‍हाने व कार्यसंचालन ओळखण्‍यासाठी ग्राहक, मालमत्ता भागीदार व कर्मचारी-केंद्रीत उपक्रमांचा समावेश आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये ओयो पुढील १० दिवसांमध्‍ये १००० हॉटेल्‍समध्‍ये या उपायांची अंमलबजावणी करण्‍याची योजना आखते. तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्‍यानंतर देशातील सर्व १८,००० हॉटेल्‍समध्‍ये उपायांची अंमलबजावणी ​करण्यात येणार आहे.

ग्राहक व हॉटेलमधील कर्मचा-यांच्‍या सुरक्षिततेसाठी विविध प्राधान्‍यस्‍तरीय कार्यवाही करण्‍यात येतील. ओयोला लॉकडाऊननंतरच्‍या विश्‍वामध्‍ये ग्राहकांच्‍या गरजा मोठ्या प्रमाणात बदलतील, याबाबत देखील माहित आहे. म्‍हणून सद्यस्थितीमध्‍ये कार्यसंचालन सुरळीत ठेवण्‍यासाठी ओयोने ग्राहकांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍यासाठी व त्‍याचे व्‍यवस्‍थापन पाहण्‍यासाठी उपाय योजले आहेत. 

​​कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी ‘प्रोजेक्ट स्टे आय’

चेक-इन आणि चेक-आऊट:
सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन होत असल्‍याच्‍या खात्रीसाठी ओयो किमान संपर्क येण्‍याच्‍या खात्रीसह अतिथी चेक-इन व चेक-आऊट प्रक्रियेमध्‍ये सुधारणा आणत आहे. हॉटेल शृंखला हॉटेलमधील त्‍यांची औपचारिकता पूर्ण करण्‍याकरिता अतिथींना त्‍यांचे आयडी, क्‍यूआर कोड अपलोड करत आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.
किमान संपर्क सेवा:
ग्राहकांशी संपर्क येणा-या सर्व टचपॉइण्‍ट्समध्‍ये सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन होत असल्‍याच्‍या खात्रीसाठी ओयो किमान संपर्क होणारी रूम सर्विस देईल आणि याबाबत हाऊसकिपिंग कर्मचा-यांना प्रशिक्षण देईल.
सॅनिटाईज स्‍टेज टॅग:
व्‍यासपीठावर नोंदणीकृत सर्व ओयो प्रॉपर्टीज बुकिंग पानावर सॅनिटायझेशनची पातळी दाखवतील. हॉटेल्‍सची सॅनिटायझेशन, स्‍वच्‍छता व संरक्षणात्‍मक उपकरणासाठी नियमितपणे बॅकग्राऊण्‍ड ऑडिट तपासण्‍या करण्‍यात येतील. यापैकी बॅकग्राऊण्‍ड तपासणीनंतर मंजूरी देण्‍यात आलेल्‍या प्रॉपर्टीजना बुकिंग पानावरील ‘सॅनिटाईज स्‍टेज’ टॅगवर दाखवण्‍यात येतील. तसेच ‘सॅनिटाईज स्‍टेज’ टॅगच्‍या सातत्‍यतेच्‍या खात्रीसाठी अभिप्राय, अवलोकन व शिफारसींना विचारात घेत प्रॉपर्टीजमध्‍ये नियमितपणे अतिथी ऑडिट करण्‍यात येईल.  

लॉकडाऊननंतरच्‍या ओयोच्‍या तयारीबाबत बोलताना दक्षिण आशियातील मुख्‍य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर म्‍हणाले, ”ग्राहकांची आदरातिथ्‍य क्षेत्राबाबत वर्तणूक बदलताना दिसत आहे. आरोग्‍यदायी, सुरक्षित दर्जाच्‍या व किमा  स्‍पर्श होणा-या एसओपींना लवकरच प्राधान्‍य दिले जाणार आहे. एक जबाबदार आदरातिथ्‍य शृंखला म्‍हणून ओयोमध्‍ये आम्‍ही लॉकडाऊननंतर अतिथींचे स्‍वागत करण्‍याप्रती आणि आमच्‍या सर्व भागधारकांसह आमचे अतिथी, भागीदार व ओयोप्रीन्‍युअर्ससाठी आरोग्‍य, स्‍वच्‍छता व स्‍वास्‍थ्‍याला अधिक प्राधान्‍य देण्‍याप्रती अथक मेहनत घेत आहोत. सद्यस्थिती पाहता कंपनीच्‍या कानाकोप-यामधील आमच्‍या टीम्‍स आमच्‍या सर्व अतिथींचे स्‍वागत करण्‍यासाठी सुर‍क्षितता व स्‍वच्‍छतेच्‍या खात्रीकरिता नवीन मार्गांचा शोध घेत आहेत. आम्‍ही आमच्‍या अतिथींचे स्‍वागत करण्‍यासाठी प्रॉपर्टीजमध्‍ये सॅनिटाईज स्‍टेला चालना देण्‍यासाठी आमच्‍यासह सामील झालेल्‍या आमच्‍या मालमत्ता मालकांचे विशेष आभार मानतो.” 
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here