इस्लामाबाद :
पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे. मात्र नव्या आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानातील गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान सरकारचे आर्थिक सल्लागार अब्दुल हफिज शेख यांनी आर्थिक सर्वेक्षण 2019-20 मध्ये देशातील गाढवांची संख्येत 1 लाखांची वाढ झाली. या वाढीनंतर देशातील गाढवांची एकूण संख्या 55 लाखांपेक्षा अधिक झाल्याची माहिती दिली आहे. गाढवांच्या व्यापारातून पाकिस्तानची कमाई होते. त्यामुळे या वाढलेल्या संख्येमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे.
आता स्टॉकमध्ये ‘ग्रो’ होण्याची संधी
पाकिस्तान चीनला दरवर्षी ८० हजार गाढवं पाठवतो. या गाढवांचा उपयोग मांस आणि इतर उत्पादनासाठी करण्यात येतो. गाढवाच्या चामड्याचा वापर विविध उत्पादनात करण्यात येतो. चामड्यातून काढण्यात येणाऱ्या एका खास जिलेटीनचा वापर अनेक प्रकारच्या औषधात करण्यात येतो. गाढवांच्या व्यापारामध्ये अनेक चिनी कंपन्यांनी लाखो डॉलरची गुंतवणूक केली आहे. पाकिस्तान हा गाढवांची सर्वाधिक संख्या असणारा देश आहे. प्रजातीनुसार गाढवांच्या किंमती ठरवल्या जातात.
पाकिस्तानमध्ये एका गाढवाच्या चामड्याची किंमत ही १५ ते २० हजारांच्या घरात असते. या चामड्याच्या विक्रीतून पाकिस्तान चांगली कमाई करते. त्याशिवाय गाढवांवर उपचारासाठी खास वेगळे रुग्णालयेदेखील आहेत.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…