‘२१ दिवसांत भरा, ७१७ दशलक्ष डॉलर’

anil

लंडन :
रिलायन्स समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. लंडनमधील एका न्यायालयानं त्यांना चीनच्या तिन बँकांची ७१७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम फेडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना २१ दिवसांमध्ये ही रक्कम फेडावी लागणार आहे. “या प्रकरणात अनिल अंबानी यांची वैयक्तिक हमी आहे. यामुळे त्यांना ही रक्कम भरावीच लागेल,” असं हायकोर्ट ऑफ इंग्लंड अँड वेल्सच्या व्यावसायिक विभागाच्या न्यायमूर्ती नीगेल टियरे यांनी सांगितलं.
सिल्वर लेकची रिलायन्समध्ये 5655 कोटींची गुंतवणूक 

as
ही रक्कम भरण्यास प्रतिवाद्यांना बंधनकारक आहे, असं न्यायमूर्ती नीगेल यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे. यामुळे त्यांना ही संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. ही एकूण रक्कम ७१ कोटी ६९ लाख १७ हजार ६८१ डॉलर्स इतकी आहे.
​​न्यायमूर्ती डेव्हिड वॅक्समन यांनी ७ फेब्रुवारी रोजी या खटल्याची सुनावणी घेऊन २०२१ मध्ये पूर्ण सुनावणी होईपर्यंत सहा आठवड्यांत १० कोटी डॉलर्सची रक्कम भरण्याचे आदेश अंबानींना दिले होते. परंतु आता या रकमेत ७ लाख ५० हजार पौंडांची अधिक रक्कम जोडण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता अनिल अंबानी यांना ७१७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम फेडावी लागणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here