आता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स

paypoint

मुंबई :
पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना पैसे पाठवू शकतील. या विमा कवचाच्या आधारे एखादी अप्रिय घटना, जसे की, अपघातात मृत्यू किंवा काही प्रमाणात, तात्पुरती, कायमस्वरूपी अथवा पूर्ण अपंगत्व ओढवल्यास रु. 50,000 चे विमा कवच उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शून्य प्रीमियम किंमतीवर हे कवच खासकरून पेपॉईंट इंडियाच्या ग्राहकांकरिता उपलब्ध आहे, विशेष करून ज्या व्यक्ती भारतातील अतिदुर्गम भागात राहतात तसेच जे अकुशल स्थलांतरीत कामगार आहेत. या लाभाचा फायदा घेण्यासाठी उपभोक्त्याला नजीकच्या पेपॉईंट स्टोअरमधून किंवा पेपॉईंटझ् वॉलेट द्वारे पैसे पाठवता येणार आहेत. हस्तांतरणाची रक्कम कितीही असू द्या, नंतरच्या महिन्यात नवीन रक्कम हस्तांतरीत होताना या कवचाचे स्वयंचलित पद्धतीने नूतनीकरण होईल. अकुशल कामगार अचानक अपघातग्रस्त होण्याची शक्यता अधिक: विमा लाभ हा प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्र आणि शहरे किंवा कारखान्यांत राहणारे आणि कमावणारे, वाहतूक, माल भरणे आणि माल रिकामा करण्याच्या कामात गुंतलेल्या कामगारांसाठी तयार करण्यात आला आहे. सरकारी नोंदीनुसार या अकुशल कामगारांमध्ये त्यांच्या कार्यकालादरम्यान अपघाती दुर्घटनांची शक्यता जास्त असते.अशा स्वरुपाच्या स्थलांतरीत कामगारांच्या जीवनात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या अद्वितीय उपक्रमाविषयी बोलताना पेपॉईंट इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर केतन दोशी म्हणाले की, “भारतातील नागरीक विमा सेवेचा लाभ घेणारे नसून या दृष्टीने अतिशय गंभीर देश म्हणून भारताची परंपरा राहिली आहे. या उपक्रमामार्फत ज्यांना फार आवश्यकता आहे, अशा घटकांना वित्तीय सुरक्षा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांना व्यवहाराची सोय उपलब्ध करून देऊन, आम्हाला ते त्यांच्या कुटुंबियांबाबतच्या वचनबद्धतेकरिता सजग आणि अभिमान बाळगणारे होणे अपेक्षित आहेत.”
paypoint
कोविड-19 महासाथी दरम्यान सामाजिक आणि वित्तीय सुरक्षेची खातरजमा करणे: विविध एनजीओ अहवालानुसार, देशभरात टाळेबंदी असताना- 25 मार्च ते 31 मे या कालावधीत किमान 1,461 अपघातांची नोंद झाली- किमान 750 लोक मृत्युमुखी पडले, ज्यामध्ये 198 स्थलांतरीत कामगार देखील होते. अशा पद्धतीच्या अनिश्चित काळात सामाजिक आणि वित्तीय सुरक्षेची गरज असताना अशा पद्धतीचे लाभ स्थलांतरितांना मौलिक साह्य पुरविण्यासाठी कारणीभूत ठरतात. पुढील वर्षापर्यंत पेपॉईंट’च्या नेटवर्कद्वारे 48,000 हून अधिक डिजिटली-सक्षम रिटेल स्टोअरद्वारे 1 दशलक्ष ग्राहकांना कवच उपलब्ध करून देण्यात येईल.
“या महासाथीने स्थलांतरीत कामगारांना मोठ्या संकटात टाकले. समाजातील सर्वात खालच्या, दुर्लक्षित घटकापर्यंत पोहोचण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने स्वयं-रोजगार कमावणाऱ्या स्थलांतरीत कामगारांच्या आर्थिक लवचिकतेला प्राधान्याने लक्षात घेतले, त्यांना सुरक्षित पर्यायाची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न आहे”, असे श्री. केतन दोशी म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here