मुंबई:
ब्रह्मपुत्र नदीतील पुरामुळे आसाममधील अनेक जिल्ह्यांतील गावे सध्या मुसळधार पाण्याखाली आहेत. गरीब गावकऱ्याकडे सध्या कोणत्याही प्रकारची सेवा उपल्ब्ध नसून बहुतेक मूलभूत वस्तू खरेदी करण्यासाठी रोख रकमेची आवश्यकता असते.
या कठीण काळात पेपॉईंट इंडियाचे ग्राहक सेवा प्रदाता काशेम अली तेथील लोकांना बँकिंग सुविधा पुरवित आहेत. त्याच्या छोट्या पण नाविन्यपूर्ण मार्गाने दररोज सकाळी आसामच्या बार्पेटा जिल्ह्यात ते लॅपटॉप, इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी डोंगल, फिंगरप्रिंट स्कॅनर, मूलभूत प्रिंटर इत्यादी घेऊन स्थानिक बोटीवर बसून प्रवास करतात आणि ७ गावांना बँकिंग सेवा देण्यासाठी ब्रह्मपुत्रांच्या वाहत्या व वेगवान वाहणाऱ्या पाण्यात ६ कि.मी.पर्यंत जाऊन ही सुविधा प्रदान करतात.
महिंद्रा फायनान्सचे राइट्स इश्यू आजपासून खुले
पेपॉईंट इंडिया आणि एसबीआय मिळून ही बँकिंग सेवा तेथील लोकांना देत आहेत, काशेम अली सर्व मूलभूत बँकिंग सेवा प्रदान करत आहेत, यामध्ये इतर बँकांच्या खात्यातून पैसे काढणे देखील समाविष्ट आहे. ते दररोज ही सेवा देत आहे, आपला जीव धोक्यात घालून या छोट्या आणि पूरग्रस्त गावांमधील २,२०० हून अधिक रहिवाशांना स्वतःचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करणे काढणे याशिवाय पर्याय नाही या सुविधेमुळे त्यांना फार मदत होत आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…