‘पेटीएम’च्या सहाय्याने ‘फीड माय सिटी’

​मुंबई :
​कोरोना विरोधातील लढाईमध्ये आता मुंबईतील स्‍थंलातरित कामगार, तसेच रोजंदारी मजूरांसाठी आहार व्‍यवस्‍था उपलब्‍ध करून​ देण्यासाठी पेटीएमने पुढाकार घेतला असून, ​त्यासाठी केव्‍हीएन फाऊंडेशनसोबत​ जोडून घेतले आहे. ​
मुंबईमध्‍ये लॉकडाऊनमुळे उत्‍पन्‍नाचा स्रोत गमावलेल्‍या १६ हजार लोकांना प्रतिदिन आहाराचे वाटप केले जात आहे. आगामी आठवड्यांमध्‍ये मुंबईत आणखी २.५ लाख आहार पॅकेट वितरित करण्‍या​त येणार आहे. केव्‍हीएन फाऊंडेशनने सुरू केलेली ‘फीड माय सिटी’ मोहिम नोएडा, बेंगळुरू, चेन्‍नई व हैद्राबादमध्‍ये राबवली जात आहे. या मोहिमेमध्‍ये सहयोग देण्‍याची इच्‍छा ​असणाऱ्यांनी पेटीएम ॲपमध्‍ये लॉग इन करून ‘फीड माय सिटी’ टॅबवर क्लिक करत दान देऊ शकतात.​​ पेटीएमचे उपाध्‍यक्ष सिद्धार्थ पांडे म्‍हणाले, ”या लॉकडाऊनमुळे मुंबईमधील हजारो रोजंदारी मजूरांच्‍या उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे. ते आणि त्‍यांचे कुटुंब एकही दिवस उपाशी राहणार नाही याची आम्‍ही खात्री घेत आहोत. केव्‍हीएन फाऊंडेशनसोबतचा सहयोग याच दिशेने आमचा प्रयत्‍न आहे.
”केव्‍हीएन फाऊंडेशनने सांगितले, ”या संकटमय स्थितीचा रोजंदारी मजूर, स्‍थलांतरित मजूर, तसेच सुरक्षा रक्षक, विमा किंवा बचतीपासून वंचित लोकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. हे लोक आपल्‍या दैनंदिन जीवनाचा आवश्‍यक भाग आहेत. पेटीएमने मुंबईमध्‍ये या महान उद्देशामध्‍ये योगदान देणे शक्‍य केले आहे. आम्‍ही सर्वांना आवाहन करतो की, या लॉकडाऊन कालावधीदरम्‍यान आपले योगदान देत कोणीही उपाशी न राहण्‍याची खात्री घ्‍या.”​​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here