मुंबई:
‘पीटर इंग्लंच्यावतीने वेलनेस फॅशन इनिशिएटीव्ह अंतर्गत नीम तुलसी कलेक्शन लॉन्च करण्यात आले आहे. या कलेक्शन अंतर्गत पीटर इंग्लंड शर्ट, मास्क, जीन्स, बर्म्युडाज, कुर्ता आणि पायजमा लॉन्च करणार आहे. या उत्पादनांकरिता कंपनीचे पेटंटेड तंत्रज्ञान “एन्लीवेन”चा वापर करण्यात आला असून त्यामध्ये 100% नैसर्गिक कडूनिंब, तुळस आणि इतर उपयुक्त औषधी वापरल्या आहेत. कपडे उत्पादनात व्यापक स्वरुपात स्वच्छतेला चालना मिळावी आणि विषाणू-विरहीत, बुरशी-मुक्त आणि उपचारीत कापड उपलब्ध व्हावे यासाठी किमान युपीएफ 20 अल्ट्रावॉयलेट किरणांचा वापर करण्यात आला आहे. आयआयटी दिल्ली समवेत वर्षानुवर्षे तांत्रिक सहकार्य कंपनीकडून घेण्यात येत असून या संस्थेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच अॅडव्हान्टेज नेचर (युनिट ऑफ एटीपीएल)- अॅडव्हान्टेज ऑर्गनिक नॅच्युरल्स टेक्नोलॉजीज प्रा. लि.कडून विकसीत, खात्रीशीर, पेटंट-प्राप्त एन्लीवेनचा वापर उत्पादनात केला आहे.
आयआयटी दिल्लीच्या टेक्नोलॉजी बिझनेस इन्क्युबेशन युनिट येथे या स्टार्ट-अप कंपनीची स्थापना झाली. कपड्यांत हे हटके तंत्रज्ञान वापरण्याची पहिलीच वेळ आहे. AATCC 100-2012 आणि AATCC183 परीक्षण पातळीवर तपासण्यात आलेले नैसर्गिक घटक 20 स्वच्छ धुलाईपर्यंत टिकून राहतात. वेलनेस फॅशनचा त्यांचा प्रवास सुमारे 2 वर्षांपूर्वी सुरू झाला. हिमाचल प्रदेशातील लहानशा गावात असलेल्या कारखान्यात निर्मितीला सुरुवात झाली. या कपड्यांच्या निर्मितीत प्राचीन पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे. आयुर्वेदीक वनस्पतींच्या अर्काचा फायदा, नव्या दमाचे एकीकृत नॅनो-तंत्रज्ञान, नैसर्गिकरीत्या सर्वोत्तम शाश्वत मार्ग उपलब्ध करून देण्यात आला. शर्टचे कापड हे प्रामुख्याने होम-मेड-कॉटन उपक्रमात ऊर्जाक्षम लघु स्वरुपातील युनिटद्वारे तयार करण्यात आले. उत्पादनासाठी लागणारा कापूस थेट शेतक-यांकडून घेण्यात येतो, मध्यस्थ नसतात.
या लॉन्चविषयी बोलताना पीटर इंग्लंडचे सीओओ मनिष सिंघाई म्हणाले की, “नीम तुलसी कलेक्शन लॉन्चसाठी आम्ही उत्सुक आहोत, ही काळाची गरज आहे. या उत्पादन श्रेणीसोबत भारतीय प्राचीन वेदिक परंपरा अंगीकारण्याचे आमचे उदिष्ट आहे. आम्ही शाश्वत आणि वेलनेस फॅशनचा नवीन मापदंड निर्माण केला. एक ब्रँड म्हणून आम्ही ग्राहकांच्या प्रगत जाणीवांना सेवा उपलब्ध करून देत आहोत, आमच्या आजच्या फॅशन वर्गात हे कलेक्शन मुलखावेगळे सिद्ध होईल.”
आदिवासी शाळांचे होणार ‘स्टेपॲप’
अॅडव्हान्टेज नेचर (एटीपीएलचा भाग)चे सीएमडी राजीव राय सचदेव या लॉन्चविषयी बोलताना म्हणाले की, “आदित्य बिर्ला समुहासारख्या नामांकीत पीटर इंग्लंडसारख्या जबाबदार ब्रँडसोबत भागीदारीचा आम्हाला अभिमान वाटतो. एक टेक्नो-स्टार्टअप कंपनी म्हणून आम्हाला आमच्याप्रमाणे ध्येय-विचार असणाऱ्या ब्रँडसोबत काम करण्याची इच्छा होती. पीटर इंग्लंड हे नाव शाश्वत उत्पादनाशी निगडीत आहे. हे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्तुळाकार अर्थकारणाला चालना देणारे आहे. एन्लीवेन हे खऱ्या अर्थाने सर्वात शाश्वत, सुरक्षित आणि 100% नैसर्गिक उत्पादन आहे. एन्लीवेन उपचारीत कापड विषाणू, बुरशीला अटकाव करते, दुर्गंधी रोखते, ते युव्ही-प्रतिकार करणारे आहे. त्याचप्रमाणे त्यात मच्छरांना रोखणारे घटक आहे. याशिवाय, आपल्या त्वचेवर रासायनिक डायचा होणारा नकारात्मक वापर टाळणे शक्य होईल. सध्याची परिस्थिती पाहता, उपभोक्त्यांच्या सुरक्षेच्या मानाने हे उत्पादन सर्वात उपयुक्त ठरणार आहे.” कॅम्पेन कम्युनिकेशनची निर्मिती डीडीबी मुद्रा, बंगळूरूच्या सर्जनशील भागीदारीने करण्यात आली.
या कॅम्पेनविषयी माहिती देताना डीडीबी मुद्रा, बंगळूरू, रिजनल क्रिएटीव्ह हेड- अॅडव्हर्टायजिंग अँड डिजीटल, विष्णू श्रीवास्तव म्हणाले की, “कडूनिंब आणि तुळस भारतीय घरांच्या परसदारी वाढवले जातात. अनेक भारतीय पिढ्यांनी हे औषधी वृक्ष जतन करण्याची परंपरा जपली आहे. आपल्या कपड्यांवरही या औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा उपचार असावा म्हणून फॅशन कल्पकतेत मोठी झेप घेतली गेली. आम्ही ग्राहकांच्या जीवनात अर्थवाही हस्तक्षेप निर्माण करण्याच्या अनुषंगाने डीडीबी मुद्रा’मध्ये ही पॅशन जपली आहे. पीटर इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय वारसा पाहता हे आव्हानात्मक होते. हे उत्पादन खऱ्या अर्थाने भारतीय परंपरा जपणारे आहे. पीटर इंग्लंडसमवेत भागीदारीकरिता आम्ही अतिशय उत्सुक असून जगाला अशाप्रकारचे पहिले नाविन्यपूर्ण उत्पादन सादर करत आहोत.”