​आणि आता आले ‘अँटीव्हायरस’ कपडे…

मुंबई :
कोरोना प्रसारामुळे जगभरातील सगळ्याच उद्योगांची गणिते बदलली आहेत. त्याचप्रमाणे लोकांच्या जगण्याच्या पद्धतीदेखील आरोग्यपूरक झाल्या आहेत. त्यामुळे आता कपडेदेखील आरोग्यासाठी पूरक करण्यावर विविध कंपन्यांनी भर दिला आहे. त्यातच आता पीटर इंग्लंडने ब्रँड जीवाणू आणि विषाणूंना रोखणारी गुणधर्म असणारे फॅशनेबलआणि स्टायलिश कलेक्शन सादर करण्यास सज्ज आहे. या ब्रँडने स्वीत्झर्लंडस्थित HeiQ या नाविन्यपूर्ण टेक्सटाईलसाठी जगभरात आघाडीवर असलेल्या ब्रँडसोबत भागीदारी करत अनोखे HeiQ वायरोब्लॉक® हे कपड्यांमधील तंत्रज्ञान भारतात आणले आहे. या कलेक्शनमध्ये पीटर इंग्लंडतर्फे वर्क वेअर, लाऊंज वेअर आणि फेस मास्क सादर करून नव्या युगातील ग्राहकांच्या सर्व लाइफस्टाइल गरजा पूर्ण करणार आहे.HeiQ वायरोब्लॉक® कापडाला जीवाणू प्रतिबंधित वैशिष्ट्यांनी खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर विषाणू आणि जीवाणू टिकण्यास आणि त्यांची वाढ होण्यास प्रतिबंध केला जातो. मास्कच्या कापडातील हे वैशिष्ट् ते 30वेळा हळुवार धुण्यापर्यंत टिकून राहते. तर कपड्यांमध्ये ही वैशिष्ट्य 20 धुण्यांपर्यंत टिकतात.
या सादरीकरणासंदर्भात पीटर इंग्लंडचे सीओओ मनिष सिंघाई म्हणाले,”सध्या जगभरात जी परिस्थिती आहे ती पाहता सुरक्षितता आणि संरक्षण आताइतके यापूर्वी कधीच महत्त्वाचे नव्हते. जीवाणू आणि विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या वैशिष्ट्यांनी सज्ज कपड्यांची रेंज आणि मास्क सादर करण्यासाठी स्वीत्झर्लंडच्या HeiQ या जगातील आघाडीच्या टेक्सटाईल इनोव्हेटर कंपनीसोबतची भागीदारी घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे. देशातील संरक्षण आणि सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने वर्क वेअर, मास्क आणि लाऊंज वेअर सादर करणार आहोत. हे नवे तंत्रज्ञान म्हणजे लाईफस्टाईल विभागातील एक नवा टप्पा आहे आणि यामुळे ग्राहकांच्या मनात आम्हाला अधिक दृढ स्थान मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.
देशी स्टार्टअप ‘ट्रेल’ला वाढता प्रतिसाद

“अँटीव्हायरल तंत्रज्ञानासोबतच पीटर इंग्लंडने स्वतंत्रपणे त्यांच्या मास्कमध्ये सुक्ष्म थेंबांना प्रतिरोध करणारे वैशिष्ट्य आणि स्मार्ट स्ट्रॅप्स दिले आहेत. सुक्ष्म थेंबांना प्रतिरोध करणाऱ्या वैशिष्ट्यामुळे मास्कचे कापड हायड्रोफोबिक बनते. त्यामुळे संसर्गजन्य थेंब मास्कच्या बाह्य पृष्ठभागावर अडवले जातात आणि ग्राहकांना सुयोग्य संरक्षण मिळते. या मास्ममध्ये वापरलेल्या स्मार्ट स्ट्रॅप्स मऊ आहेत आणि आरामदायीपणा, योग्य फिट आणि वापरात नसताना मास्क गळ्यात टाकता यावा यासाठी या स्ट्रॅप्सना तीन प्रकारच्या अॅडजेस्टमेंट दिलेल्या आहेत. चीन मास्क आणि नाकाच्या क्लिपसोबत चेहऱ्याच्या ठेवणीप्रमाणे डिझाइन असल्याने ग्राहकाच्या चेहऱ्यावर हे मास्क अगदी सुयोग्य पद्धतीने बसतात. ही सगळी दमदार वैशिष्ट्ये विविध स्टाईल्स, पॅटर्न्समध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे संरक्षण, आरामदायीपणा आणि स्टाईल असं सर्व काही एकाच वेळी देणारे हे सर्वसमावेशक उत्पादन आहे.HeiQ ग्रूपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्लो सेंटोंझ म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here