६६२ जिल्ह्यात ‘पीएनबी’चे कोविड-19 मदतकार्य

मुंबई :
पंजाब नॅशनल बँकच्यावतीने हमसफर ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातील 662 जिल्ह्यांमध्ये कोविड -१९ प्रतिबंध सामग्री प्रदान करण्यात येत आहे. हमसफर ट्रस्ट ही कोविड -१९ विरूद्ध लढा देणारी भारतातील पहिली समुदाय-आधारित संस्था आहे.
बँकेच्या या मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात, देशभरातील सर्व कार्यालयांनी फेस मास्क आणि सेनिटायझरवितरण कार्यक्रम आयोजित केले होते.यात अमृतसर, लखनौ, हैदराबाद, गुवाहाटी, अहमदाबाद, बिलासपूर, भोपाळ, जबलपूर, इंदूर, रायपूर या शहरांचा प्रमुख सहभाग होता.
दुसर्‍या टप्प्याची सुरुवात पीएनबीचे ईडी, डॉ. राजेश कुमार यदुवंशी यांनी केली. श्री संजय कुमार, ईडी, पीएनबी आणि श्री विजय दुबे, ईडी, पीएनबी प्रतिबंधक सामग्रीचे वितरण करून पीएनबी मुख्य कार्यालय, नवी दिल्ली येथील सुविधा व्यवस्थापन कर्मचारी, पीएनबी आणि हमसफर ट्रस्ट संपूर्ण देशातील एलजीबीटी सदस्यांना फेस मास्क, सॅनिटायझर्स वितरित करतील. हा कार्यक्रम पीएनबीच्या मुंबई सर्कल कार्यालयात झाला.
दरम्यान, बँकेच्या वतीने मुख्य महाप्रबंधक डी. चंद आणि महाप्रबंधक, विभागीय कार्यालयाचे महाप्रबंधक आर. के. हेगडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री कोविड-१९ मदतनिधीसाठी 64 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ठाकरे यांनीबँकेकडून केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

पीएनबीच्या सीएसआर प्रयत्नांवर भाष्य करताना पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश कुमार यदुवंशी म्हणाले,आम्ही नेहमीच सर्वसमावेशक राहिलो आहोत. पीएनबी अशा समुदायांना या अभूतपूर्व संकटातून त्यांचे संरक्षण करण्यासाठी कृतीशीलपणे पाठिंबा देत राहील. सर्व देशभर उद्भवलेल्या या संकटांचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या व्यापक प्रयत्नांना आम्ही अशीच साथ देत राहू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here