पीएनबीने केली ‘इतक्या’ कोटींची कर्ज मंजुरी

मुंबई :
केंद्र सरकारच्या पत हमी योजनेंतर्गत ६७५७ कोटी रुपयांच्या कर्जाला पंजाब नॅशनल बँकेने मंजुरी दिली असून, या कर्जमंजुरीचे अंदाजे ३ लाख मध्यम आणि लघु उद्योजक लाभार्थी असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. सरकारच्या आपत्कालीन योजनेंतर्गत (ईसीएलजीएस) अंतर्गत छोट्या उद्योगांना पंजाब नॅशनल बँकेने सर्वाधिक कर्जवितरण केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी २०१७ पासून २७ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. “एमएसएमई: सामाजिक गरजांना प्रथम प्रतिसाद देणारे” हे यंदाच्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम दिवस सूत्र आहे. भारत सरकारने एमएसएमईला वेगळे उपक्रम म्हणून मान्यता दिली आहे.  
पीएनबीतर्फे लडाख शहिदांना श्रद्धांजली

आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त, , “पीएनबी आपल्या मान्यवर एमएसएमई ग्राहकांना महत्त्व देते आणि या सध्याच्या जागतिक संकटाच्या वेळी बँक त्यांच्या पाठीशी उभे असून त्यांना साथ देत आहे. यावर्षी आम्ही या संकटावर मात करण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. असे प्रतिपादन पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस एस मल्लिकार्जुन राव यांनी आपल्या ग्राहकांना निवेदनात म्हटले आहे. 
भारतीय एमएसएमईना त्यांचे कामकाजी भांडवल आणि व्यवसायाचे पुनर्संचलन करण्यासाठी त्वरित कर्ज मंजुरी आवश्यक आहे. सध्याच्या विस्कळीत अर्थव्यवस्थेमुळे जे कर्जदार पूर्वीच्या कर्जाची पुनर्फेड करण्यास असमर्थ आहेत अशा कर्जांसाठी पुनर्फेडीची  मुदार ३१ ऑक्टोबर पर्यंत वाढविली आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here