पीएनबीची ग्रामीण भागात ‘कोविड सुरक्षा’

मुंबई :
सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी एका राष्ट्रव्यापी मोहिमेला सुरवात केली आहे. या 
मोहिमेचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झाले. थील निर्माण भवन येथे या मोहिमेचे उद्घाटन झाले.
निफ्टी 11000 पार; सेन्सेक्सही तेजीत

या मोहिमे अंतर्गत भारतातील ६६२ जिल्ह्यात कोरोनाशी सामना करण्यासाठी फेस माक्स, जंतूनाशक इत्यादी सामग्रीचे वाटप करण्यात येणार आहे. ही मोहीमेसाठी 
खर्चाची तजवीज कंपन्यांच्या सामजिक जबाबदारी निधीतून करण्यात आल्याचे बँकेने प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. बँकेच्या सामाजिक जबाबदारी निधी अंतर्गत केलेल्या खर्चापैकी आजवरचा सर्वाधिक मोठा खर्च करण्याचे बँकेने ठरविले आहे. या मोहिमेच्या उद्घाटनाला बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबरीने देशातील २२ क्षेत्रीय कार्यालयांचा सहभाग होता.
देशाच्या सेवेसाठी पीएनबी देत असलेल्या योगदानाची डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी प्रशंसा केली. राष्ट्रवादाच्या भावनेतून लाला लजपतराय यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रेरणेने पंजाब नॅशनल बँक या देशातील पहिल्या स्वदेशी बँकेची स्थापना झाली, असे त्यांनी सांगितले. सर्वार्थाने भारतीयांकडून चालवली जाणारी आणि भारतीय भांडवल असलेली ही पहिली बँक होती, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा समावेश असलेल्या जालियनवाला बाग समितीचे खाते उघडण्याचा बहुमान या बँकेला प्राप्त झाला होता.
संपूर्ण जग कोविड-19 ने समस्याग्रस्त झालेले असताना पीएनबीने ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या महामारीच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यामध्ये सरकारला पंजाब नॅशनल बँक पाठबळ देत असल्याबद्दल आपल्याला समाधान वाटत आहे, असे ते म्हणाले. या बँकेने पीएम केअर्स फंडमध्ये योगदान दिले आहे आणि मास्क आणि सॅनिटायजर वितरणाचे सीएसआर उपक्रम राबवले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. मास्कच्या वापरामुळे आणि हाताच्या स्वच्छतेमुळे कोविड प्रतिबंधक उपाययोजनांना चालना मिळते आणि सध्या या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेली ही सर्वात उत्तम सामाजिक लस आहे, असे त्यांनी नमूद केले. देशभरातील 662 जिल्ह्यांमध्ये बँकेकडून या सामग्रीचे वितरण करण्यात येणार आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांबद्दल मी पीएनबीचे अभिनंदन करतो, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here