प्रियंका पाठक ठरली ‘ग्रिड’ची विजेती

मुंबई :
‘सेफजॉब’च्यावतीने ‘द ग्रेट इंडियन डिस्कशन अर्थात ग्रिड’ ही भारतातील पहिली व्हर्चुअल ग्रुप डिस्कशन स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत देशभरातील ७० शहरांमधील ३,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात डीएव्ही कॉलेजची प्रियंका पाठक या बौद्धिक स्पर्धेची लाइव्ह डिस्कशनची विजेती ठरली.  तर प्रथम आणि द्वितीय उपविजेत्यांत अनुक्रमे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीची उर्वी काथुरिया आणि आयएएमआर कॉलेजचा शिवम गोयल यांचा क्रमांक लागला. विजेत्यांना ३०,००० रुपये, २०,००० रुपये आणि १०,००० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यात दिल्ली युनिव्हर्सिटी, गॅलगोटिअस युनिव्हर्सिटी, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, आयटीएम युनिव्हर्सिटी इत्यादीसारख्या शीर्षस्थ संस्थांसह ५०० कॉलेजचा समावेश होता. अशा प्रकारच्या स्पर्धांद्वारे सेफजॉबला देशातील प्रत्येक काना-कोप-यातील तरुण भारतीयांना कौशल्य विकसित करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे. विशेषत: सध्याच्या संकटाच्या काळात तरुणांना व्यावसायिक करिअर तसेच कॉर्पोरेट नोक-यांसाठी सज्ज होण्यास मदत करण्याचा उद्देश यामागे होता.

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी – पालकांमध्ये उत्तम समन्वय

सहभागींची क्षमता तपासण्यासाठी, त्यांच्याकडून नव्या कल्पना घेण्यासाठी, दैनंदिन घडामोडींशी संबंधित विषयांवर सामूहिक चर्चा करण्याचा एक जागरूक प्रयत्न करण्यात आला. यापैकी काही चर्चेत आत्मनिर्भर भारत योजना, नैराश्याची कारणे व ते कसे टाळता येईल? फेसबुक आणि जिओ डील- चांगली की वाईट?, कोरोनानंतरचा भारत: बचावात्मकतेकडून भरभराटीकडे, भारतीय राजकारणात सोशल मीडियाची भूमिका, उच्च शिक्षण की कौशल्य संपादन- भारताच्या वृद्धीसाठी उत्कृष्ट चालक कोण? इत्यादी विषयांचा समावेश होता.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here