रेल्वे प्रवाशांसाठी ‘प्रोटेक्ट इंडिया चळवळ’

मुंबई :
गेल्या पाच महिन्यापासून सुरु असलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे ठप्प असलेले दळणवळण हे येत्या महिनाभरात सुरु होईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे यानंतर सामान्यांचा नियमितचा रेल्वे प्रवास बिनधोक व्हावा यासाठी मध्य रेल्वे आणि गॊदरेजने संयुक्तरित्या पुढाकार घेतला आहे. यापुढे वैयक्तिक स्वच्छता हि प्रमुख बाब असल्यामुळे प्रवासातदेखील याची काळजी उभय कंपनी घेणार असल्याचे आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 
यानुसार आता गोदरेजने रेल्वे कर्मचारी व प्रवासी यांच्यात प्रवासादरम्यान स्वच्छता राखली जावी, यासाठी मध्य रेल्वे क्षेत्राशी भागीदारी केली आहे. प्रवासी गाड्यांमध्ये सुरक्षिततेसाठी हँड सॅनिटायझर सॅशे, ऑन द गो जंतुनाशक स्प्रे यासारखी नवीन उत्पादने मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणार आहेत. हवा व पृष्ठभाग यांच्यासाठीचा जंतुनाशक स्प्रे हा तिकिट बुकिंग काउंटरच्या पृष्ठभागावर निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरण्यात येणार असून, गोदरेज प्रोटेक्ट व मध्य रेल्वेचा मुंबई विभाग हे प्रवाशांच्या व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी व त्यांच्यात जागरूकता वाढविण्यासाठी ‘प्रोटेक्ट इंडिया चळवळ’ हा संयुक्त उपक्रम राबविणार असल्याचे गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’चे  भारत आणि सार्क प्रदेशांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया यांनी सांगितले. 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना ५ वर्षे सक्तीची रजा

या ‘प्रोटेक्ट इंडिया चळवळी’अंतर्गत आता मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सुरक्षित प्रवासाविषयीची जागरुकता निर्माण करण्यात येईल. त्याचप्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांना हाताची स्वच्छता राखता यावी, याकरीता त्यांना गोदरेज प्रोटेक्ट हेल्थ साबण देण्यात येईल. मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन्समध्ये, तसेच मुंबईहून बंगळुरू, हैदराबाद, तिरुअनंतपुरम, पाटणा, लखनौ, वाराणसी, भुवनेश्वर, गुवाहाटी, गोरखपूर, दरभंगा व गदग या ठिकाणी जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना गोदरेज प्रोटेक्ट हॅंड सॅनिटायझर सॅशेंचे वाटप करण्यात येईल. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील हॅडल्स, सीट्स, आर्म रेस्ट, दरवाजांची हॅंडल्स यांच्यावर, तसेच प्रवाशांच्या सामानावर गोदरेज प्रोटेक्ट ऑन द गो डिसइंफेक्टंट स्प्रे मारण्यात येईल. मुंबईतील मध्य रेल्वेच्या स्थानकांमध्ये तिकीट काऊंटर्सवरील पृष्ठभाग व आसपासचा परिसर येथे गोदरेज प्रोटेक्ट एअर अॅंड सरफेस डिसइंफेक्टंट स्प्रे मारून या जागा निर्जंतूक करण्यात येतील. या कार्यक्रमात सीएसटी ते कर्जत, पनवेल व कसारा येथपर्यंतच्या 53 रेल्वे स्थानकांमधील 87 टिकीट बुकिंग काऊंटर्सचा समावेश करण्यात येईल. कोविड-19च्या साथीच्या काळात रेल्वे प्रवास करताना स्वच्छतेची काळजी कशा प्रकारे घ्यायची, याविषयी दोन्ही संस्थांकडून डिजिटल कार्यक्रम तयार करण्यात येईल. फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्रम यावर असणाऱ्या दोन्ही संस्थांच्या एकत्रित 4.12 लाख फॉलोअर्समध्ये जनजागृती करण्याची ही योजना असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. 
गोदरेज प्रोटेक्टसमवेत संयुक्त जागरूकता कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रवाशांचे आणि कर्मचार्‍यांचे आरोग्य व त्यांची सुरक्षितता यासंबंधात पुढाकार घेण्यास मध्य रेल्वे कटिबद्ध आहे. स्वच्छताविषयक मानकांबद्दल जागरूकता वाढविणे, तसेच निवडक टचपॉईंट्सवर संबंधित उपायांसह ती राबविणे हा यामागे हेतू आहे. यातून रेल्वेने अधिक प्रवास करण्यास लोकांना प्रोत्साहित करता येईल. आम्ही या उपक्रमाद्वारे ट्रेनमध्ये, स्थानकांवर आणि डिजिटल माध्यमांद्वारे प्रवाशांशी संपर्क साधत राहू. या उपक्रमाचे यश पाहून, आम्ही तो भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये राबविण्याचा विचार करू शकतो, असे मत यावेळी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक गौरव झा यांनी व्यक्त केले. 
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here