कोविड नायकांसाठी ‘रसना’ झाले सज्ज

rasna

मुंबई :
रसना फाऊंडेशन या रसना(rasna) ग्रुपच्या सीएसआर शाखेने, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेऊन समाजात मोलाचे योगदान देण्याचे ठरवले आहे. अन्नासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे तसेच तत्काळ व तातडीच्या गरजा भागविण्यासाठी संस्थेने एक टास्क फोर्स तयार केली आहे. वैद्यकीय सेवा वाढविणे आणि आरोग्यसेवा कामगारांसाठी तसेच जे आपल्यासाठी ऑन ग्राउंड कर्तव्य बजावत आहेत अशा नायकांसाठी संरक्षक गियर तयार करत आहेत. त्याचप्रमाणे रसनाच्यावतीने कोरफड, व्हिटॅमिन ई आदींचा समावेश असलेले सॅनिटायझर बनवण्यात आले असून, ते पोलिस दलामध्ये आणि शहरातील आरोग्य सेविकांना नि:शुल्क वितरित केले आहे.
रसनाच्या प्रसिद्दीपत्रकानुसार फाउंडेशनने गरीब आणि गरजू लोकांना अन्न पॅकेटचे वितरण केले आहे. फ्रंट-लाइन कामगार आणि पोलिस दलाला रसना इन्स्टंट पावडर पेयांचे विनामूल्य वाटप करत आहे. पुढे जाऊन सामाजिक उद्योजकता समर्पित करण्याचा निर्णय रसना समूहाने घेतला आहे. नियमित जनरल ट्रेड (जीटी) आणि मॉडर्न ट्रेड (एमटी) मार्केटमध्ये वितरणासाठी ‘सानी सेफ’ हँड सॅनिटायझर भारत सरकारने सुचविल्याप्रमाणे अत्यल्प खर्चात तयार करत आहोत आणि जनरल ट्रेड (जीटी) आणि मॉडर्न ट्रेड (एमटी) च्या विक्रीतून मिळालेल्या नफ्याचा काही भाग देण्यात येईल हा निधी आपल्या पोलिस कर्मचारी आणि आरोग्य सेवा 
कर्मचाऱ्यांना विनामूल्य सॅलिटायझर पुरविण्यासाठी वापरला जाईल.

रुग्ण वाढले, शेअर बाजार कोसळला
rasna
रसना फाऊंडेशनचे संस्थापक पिरुझ खंबाट्टा म्हणाले की, राष्ट्राला मदत करुन आम्ही या महामारी विरोधात सकारात्मकतेसह लढायला बांधिल आहोत. आमचे खरे ध्येयवादी नायक ऑन ग्राउंड टास्क फोर्स आहेत जे गरजू लोकांना जीवनावश्यक गोष्टी पुरवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आमचे ध्येय आहे की समुदाय आणि आरोग्य सेवा कामगारांना शक्य तो सर्व पाठिंबा देण्यात यावा. आम्ही आमच्या घरात सुरक्षित राहू हे सुनिश्चित करण्यासाठी आमचे लोक, आमचे आरोग्यसेवक आणि सुरक्षा अधिकारी जे चोवीस तास काम करत आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत.

अर्थ जगतातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे युट्यूब चॅनेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here