हवामानाने मारले, तरी ‘रिलायन्स’ तारणार

मुंबई :
रिलायन्स जनरल इन्श्युरन्स या रिलायन्स कॅपिटलच्या 100 टक्के उपकंपनीच्या वतीने हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पन्नावर आणि उपजीविकेवर होणाऱ्या गंभीर परिणामांपासून रोजंदार वर्गाचे रक्षण करण्यासाठी एक समर्पित लाईव्हलीहुड प्रोटेक्शन इन्श्युरन्स कव्हर जाहीर करण्यात आले.
भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) किंवा हवामान डेटा पुरवठा करणाऱ्या खासगी स्वायत्त तृतीय पक्षाकडून स्वयंचलित हवामान केंद्रांमार्फत हवामान धोक्यांवर देखरेख ठेवण्यात येईल आणि या प्राप्त हवामान डेटानुसार दावा रकमेची मोजणी आपोआप करण्यात येईल. अशाप्रकारे सँडबॉक्स मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत आयआरडीएआय मान्यताप्राप्त या उत्पादनाची निर्मिती अशाप्रकारे करण्यात आली आहे. यामुळे, निश्चित केलेल्या मापदंडांसोबत वास्तविक हवामानाची तुलना करून दावे ठरविले जातील. निश्चित केलेल्या मापदंडांपेक्षा हवामान स्थिती अधिकवाईट असल्यास विमाधारक दाव्यास पात्र मानला जाईल. वारे (चक्रीवादळ, धूळ/वाळू वादळ), तापमान (शीतलहर किंवा उष्णतेची लाट), पाऊस (पूर/अतिवृष्टी) आणि हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) या कारणांनी निर्माण झालेल्या हवामानसंबंधी धोक्यांसाठी हा विमा आहे.
ठराविक कालवधी दरम्यान सर्वाधिक प्रभावित असलेल्या भौगोलिक ठिकाणाशी संबंधीत हवामान आधारित धोक्यांचा समावेश यात केला गेला असल्याने हवामान परिस्थिती गंभीर स्वरुपाची असल्यास विमाधारकाला त्वरीत मदत केली जाईल आणि हेच या विमा पॉलिसीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सुरुवातीच्या काळात, भारतातील केवळ 10,000 लोकांसाठीच हा विमा खुला करण्यात आला असून याचा हप्ता अतिशय कमी आणि किफायतशीर आहे.

‘फ्लिपकार्ट’ने केली ‘अरविंद फॅशन्स’मध्ये गुंतवणूक

या नव्या प्रगतीविषयी बोलताना रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे ईडी आणि सीईओ राकेश जैन म्हणाले, “गेल्या काही वर्षांत भारताने हवामान विषयक अनेक समस्यांचा सामना केला आहे. त्यामुळे रोजंदार वर्गाच्या उत्पन्नाबाबत आणि उदरनिर्वाहाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यादृष्टीने स्वयंरोजगारावर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तींच्या आर्थिक लवचिकपणाला प्राधान्य देण्याची गरज जाणवली. ‘नेक्स्ट-बिलियन’ भारतीयांपर्यंत विमा पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून लाईव्हलीहुड प्रोटेक्शन पॉलिसी सुरू करण्यात आली आहे.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here