नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊनचा फटका देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजला बसला आहे. रिलायन्सने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपातीची घोषणा केली आहे. तर रिलायन्सचे (Reliance) मालक मुकेश अंबानींनी पगारच न घेण्याची घोषणा केली आहे. कठीण परिस्थितीमुळे खर्चामध्ये कपात करणे अनिवार्य बनले आहे. यामुळे याकडे लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे कार्यकारी संचालक हितल मेस्वानी यांनी या पत्रकामध्ये म्हटले आहे.
रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्य़ांना पगारकपातीचा फटका बसणार आहे. यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार १५ लाखांहून अधिक आहे त्यांच्या पगारामध्ये १० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. याशिवाय परफॉरमन्स आधारीत बोनसही यंदा टाळण्यात आला आहे. याशिवाय रिलायन्सचे बडे अधिकारी, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांच्या पगारावरही कात्री लावण्यात आली आहे. या साऱ्या वरिष्ठांना ३० ते ५० टक्के कपात सहन करावी लागणार आहे.
अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.