रिलायन्समुळे सेन्सेक्समध्ये १९९ ची वाढ

मुंबई :
शेअर बाजार शुक्रवारी सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टी ५२.४५ अंक किंवा ०.५७% वाढून ९२५१.५० अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्स १९९.३२ अंक किंवा ०.६३% नी वाढून ३१,६४२ अंकांवर बंद झाला. आजच्या रॅलीचा एक मोठा भाग रिलायन्स इंडस्ट्रीज पुरस्कृत होता. रिलायन्स जिओमध्ये व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने ११,३६७ कोटी रुपयांची घोषणा केल्यानंतर सुमारे ५ टक्के वाढून १,५७९.७० रुपयांवर पोहोचला.
एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की फार्मा, एफएमसीजी, ऊर्जा, आयटी आणि इंफ्रा स्पेसमुळे आज बाजारात इंट्रा डे सेशनमध्ये जोरदार वृद्धी दिसून आली. दुसरीकडे ऑटो, बँक आणि मेटलसारख्या क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आला. बाजारातील तज्ञांच्या अंदाजानुसार, निफ्टीसाठी ९,४५० वर मजबूत प्रतिकार असेल तर घसरणीच्या दिशेने ९१३०-९१०० वर भरपूर सपोर्ट मिळेल.


टाटांनी केली ‘या’ स्टार्टअपमध्ये 50% गुंतवणूक

इंट्राडे सेशनदरम्यान टॉप गेनर्समध्ये ४.८९ टक्क्यांवर एचयूएल, ३.८५ टक्क्यांवर नेस्ले, ३.८४% वर टेक महिंद्रा, ३.८१ टक्क्यांवर डॉ. रेड्डी लॅब्स आणि ३.७२ टक्क्यांवर सन फार्माचा समावेश आहे. दुसरीकडे अॅक्सिस बँक -३.८५ %, एनटीपीसी -३.८१ टक्के, एमअँडएम -३.४८ टक्के, इंडसइंड बँक – ३.०८ टक्के आणि एसबीआय – २.४० टक्के हे आजच्या सत्रातील टॉप लूझर्स ठरले.
बीएसईच्या २६३ शेअर्सनी आज इंट्रा डे सेशनमध्ये अप्पर सर्किटला हिट केले. फ्यूचर रिटेल, वक्रांजी, इंफिबीम, रुचि सोया, फ्यूचर लाइफस्टाइल आणि एडिलवाइज फायनान्शिअलने आज दिवसभरातल्या सेशनमध्ये अप्पर सर्किट हिट केले. डॉ. रेड्डीज लॅब्स, व्हीनस रेमेडीज आणि उत्तम व्हॅल्यू स्टीलसारख्या शेअर्सनी बीएसईवर ५२ आठवड्यांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. व्होडाफोन आयडिया, लॉरस लॅब्स, आरबीएल बँक, भारतीय स्टेट बँक, येस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज व इतर शेअर्स आजच्या सत्रात व्हॉल्यूमच्या दृष्टीने सक्रिय शेअर्सच्या श्रेणीत सहभागी झाले.

अर्थ जगतातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे युट्यूब चॅनेल 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here