कर्मचाऱ्यांचे ‘फ्युचर’ केले सुखकारक

मुंबई: 
सध्याच्या आर्थिक संकटकाळात जिथे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत किंवा पगार कपात करत आहेत. तिथे फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीने मात्र आपल्या सर्व कर्मचा-यांसाठी पदोन्नती, वार्षिक पगारवाढ आणि विविध प्रकारच्या आर्थिक लाभांची घोषणा केली. त्याचप्रमाणे सध्याच्या अनिश्चित आणि अस्थिर काळात कोणत्याही कर्मचा-याला कामावरून कमी करण्यात येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.कंपनीने आपल्या बिझनेस-अॅक्टीव्ह एजंट आणि त्यांच्या कुटुंबियांची कोविड– 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यास तात्काळ मदतनिधी म्हणून प्रत्येकी रु. 50,000 ची तरतूददेखील केली आहे.

गरजेनुसार ‘ऑन-ऑफ’ करता येणारा विमा

भारतात कंपनीच्या 125 हून अधिक शाखा असून त्यांनी आपल्या व्यावसायिक आवश्यकतेनुसार कर्मचा-यांची नियुक्ती करणे तसेच नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेतलाआहे. टाळेबंदीच्या प्रत्येक टप्प्यात एफजीआयआयच्या विविध पातळ्यांवर कार्यरत असणारे 70 हून अधिक कर्मचारी सहभागिता, मुलाखती घेणे, नियुक्ती करणे तसेच प्रेरणा देण्यासाठी विविध डिजीटल माध्यमांच्या सोबतीने काम करत आहेत. अन्य वर्षाप्रमाणे यंदादेखील कर्मचारी नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले. 
फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनुप राऊ म्हणाले की, ‘एखादी कंपनी कर्मचारी-केंद्री असल्याशिवाय ग्राहककेंद्री बनू शकत नाही, त्यांच्यातील परस्पर संबंधांवर आमचा विश्वास आहे. अगोदरपेक्षा आजच्या घडीला आमचा कर्मचारी वर्ग आणि सहयोगींना आयुष्यात निश्चितता आणि स्थैर्य हवे आहे. त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व तरतूदी करत आहोत. पगारवाढ हि त्यातीलच एक बाब आहे.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here