… म्हणून सॅनिटायझर्स महागले

नवी दिल्ली :
करोनामुळे  सॅनिटायझरच्या वापरात वाढ होऊन देशभरात मागणी वाढलेली असतानाच आता त्यावर केंद्राने १८ टक्के जीएसटी आकारण्यास सुरुवात केल्यामुळे सॅनिटायझर्सच्या किमती वाढल्या आहेत. जनतेने यावर सरकारला जाब विचारला असता, अर्थमंत्रालयाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. 
सॅनिटायझर व याच प्रकारच्या इतर वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केल्यास त्यामुळे स्थानिक उत्पादकांना नुकसान सोसावं लागेल. जीएसटीच्या कमी दरामुळे आयातीलाच मदत होईल, जे की आत्मनिर्भर भारत अभियान या धोरणाच्या विरोधी आहे, असे  अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.
५० टक्के ईएमआयमध्ये घेऊन ‘जावा’ 

हातांचे निर्जतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर फायदेशीर असल्यान त्यांच्या मागणीत कमालीची वाढ झाली. मात्र, सॅनिटायझरवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीवरून केंद्र सरकारकडे नवी मागणी केली जात आहे. या मागणीवर केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. सॅनिटायझरसह अॅण्टी बॅक्टेरियल लिक्विडस, डेटॉल इत्यादींवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येईल. त्याचबरोबर हॅण्ड सॅनिटायझर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्स, पॅकिंग मटेरिअल्स आणि इतर सेवांवरही १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. 
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here