‘या’ बँकेने सुरु केली व्हिडीओ केवायसी

मुंबई :
एसबीआय कार्डने नव्या ग्राहकांसाठी आता व्हिडीओ नो युअर कस्टमर (व्हीकेवायसी) ही सुविधा सुरू केली आहे. हि नवी सुविधा डिजिटल सोर्सिंग आणि ऑनबोर्डिंगसाठी कंपनीकडून करायच्या प्रक्रियेपासून ते ग्राहकांद्वारे पूर्ण करायच्या प्रक्रियेपर्यंतचा प्रत्येक टप्पा हा पेपरलेस असावा यासाठी कंपनीकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग आहे. व्‍हीकेवायसी सुविधा सुरू झाल्याने अफरातफरीच्या प्रकरणांत मोठ्या प्रमाणात घट घडवून आणण्याच्या प्रयत्नांवर लक्षणीय परिणाम होईल, इतकेच नव्हे तर संपूर्ण केवायसी प्रक्रियेसाठी येणारा खर्च निम्म्यावर येईल, असे बँकेचे म्हणणे आहे. 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने ई-स्वाक्षरी प्रक्रिया व त्याचबरोबर ग्राहकांची ओळख पटविण्यासाठीची पद्धती म्हणून व्‍हीआयसीपी (व्हिडिओ कस्टमर आयडेंटीटी प्रोसेस) ला दिलेल्या परवानगीनंतर एसबीआय कार्डने व्‍हीकेवायसी सुविधा सुरू केली आहे. व्‍हीकेवायसी एका सहजसोप्या, कंपनीच्या कार्यालयात प्रत्यक्ष न जाता पूर्ण करायच्या प्रक्रियेचा पर्याय देऊ करते, ज्यात ग्राहकांना कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्कात यावे लागत नाही. डिजिटल माध्यमातून ग्राहकांचे ऑनबोर्डिंग करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ई-स्वाक्षरी प्रक्रियेमुळे ग्राहकाकडून डिजिटल अर्जावर डिजिटल स्वाक्षरी मिळविण्यास मदत होते. ग्राहकाने भरलेल्या अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी ग्राहकाला हा अर्ज PDF फॉर्मेटमध्ये मिळतो. त्यातील तपशीलांची पडताळणी केल्यानंतर अर्जदार या अर्जावर डिजिटल माध्यमातूनच ई-स्वाक्षरी करतो आणि कार्ड जारी करण्याची प्रक्रिया सुरू होते.
आता स्टॉकमध्ये ‘ग्रो’ होण्याची संधी

व्‍हीकेवायसी सुविधेच्या शुभारंभाबद्दल एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ हरदयाल प्रसाद म्हणाले, ”तंत्रज्ञानाच्या बळावर ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कार्यालयीन तसेच ग्राहकसंपर्काच्या पातळीवर अद्ययावत पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या कामी आम्ही धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. ग्राहकांच्या ऑनबोर्डिंगपर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक टप्पा डिजिटाइज्ड करण्यासाठी व ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत दक्षतेने करण्यात आला आहे. कॉन्टॅक्टलेस प्रक्रियेच्या माध्यमातून या कामामध्ये सुलभता आणली गेली आहे तसेच अत्यंत उच्च दर्जाची सुरक्षितताही जपली गेली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंग ही गोष्ट आपल्या रोजच्या आचरणाचा भाग बनली आहे. अशावेळी ही सुविधा आमच्या ग्राहकांसाठी अत्यंत समर्पक आहे व येत्या काळात ती लक्षणीयरित्या लोकप्रिय होईल अशी आमची अपेक्षा आहे.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here