नवी दिल्ली:
स्टेट बॅक ऑफ इंडियाने (SBI) लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या बँकेचे ग्राहक आता ३० जून २०२० पर्यंत अन्य कोणत्याही बँकेच्या एटीएममधून किती वेळाही पैसे काढू शकतील. यासाठी बँक कोणत्याही प्रकारचे शुल्क घेणार नाही.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या महिन्यात यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार बँका पुढील तीन महिने खात्यात किमान पैसे नसल्यास त्यावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणार नाही. तसेच एटीएम मधून पैसे काढण्यावर कोणत्याही प्रकारचे शुक्ल घेऊ नये, असे अर्थमंत्री म्हणाल्या होत्या. त्यानुसार एसबीआयने (SBI) हा निरामय घेतला आहे.
https://thebusinesstimes.in/kotak-mahindra-started-atm-on-wheels/
एसबीआयच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरातील ग्राहकांना स्वत:च्या बँकेतून ५ वेळा तर अन्य बँकेतून ३ वेळा पैस काढू शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. तर अन्य शहरे आणि ग्रामीण भागातील ग्राहक एसबीआयमधून ५ वेळा तर अन्य बँकांतून ५ वेळा पैसे काढू शकतात. आता ही मर्यादा बँकेने हटवली आहे.