विजयभूमी युनिव्‍हर्सिटीच्‍या पदाधिकाऱ्यांची निवड

मुंबई :
विजयभूमी युनिव्‍हर्सिटी या आयएफआयएम इन्स्टिट्यूशन्‍सच्‍या संस्‍थापकीय सदस्‍यांद्वारे स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या भारताच्‍या पहिल्‍या लिबरल प्रोफेशनल युनिव्‍हर्सिटीने त्‍यांच्‍या पहिल्‍या संचालक मंडळ बैठकीचे आयोजन करत युनिव्‍हर्सिटी अधिकारी व युनिव्‍हर्सिटीच्‍या संचालक मंडळाच्‍या नियुक्‍तीची घोषणा केली. कोविड-१९च्‍या प्रादुर्भाव कारणास्‍तव करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनमुळे जगामध्‍ये व्‍हर्च्‍युअली पहिल्‍यांदाच कार्यकारी मंडळ बैठकीचे आयोजन करण्‍यात आले. महाराष्‍ट्रातील कर्जत येथील विजयभूमी युनिव्‍हर्सिटीचे नामनिर्देशित संस्‍थापकीय अध्‍यक्ष आणि बेंगळुरूमधील आयएफआयएम इन्स्टिट्यूशन्‍सचे अध्‍यक्ष संजय पातोडे यांनी या व्‍हर्च्‍युअल बैठकीचे अध्‍यक्षस्‍थान भूषवले. 
बैठकीमध्‍ये सरकारी उमेदवार वगळता सर्व संचालक मंडळाचे सदस्‍य उपस्थित होते.

या बैठकीदरम्‍यान संचालक मंडळाने आपले निवडलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

संजय पातोडे – विजयभूमी युनिव्‍हर्सिटीचे अध्‍यक्ष,डॉ. ए. परसुरामन – प्रो-चान्‍सलर – अकॅडेमिक्‍सडॉ. अश्विनी कुमार शर्मा – प्रो-चान्‍सलर- अॅडमिनिस्‍ट्रेशन
डॉ. अतिष चट्टोपाध्‍याय – उप-कुलगुरू
सुरेखा शेट्टी – कुल‍सचिव
डॉ. वेंकटेशन सुंकद, डीन – इन्‍फोस स्‍कूल ऑफ डेटा सायन्‍स
प्रा. डॉ. नवनीत शर्मा, डीन – आयएफआयएम बिझनेस स्‍कूल
प्रा. प्रविण मिश्रा, डीन – विजयभूमी स्‍कूल ऑफ डिझाइन 

टाटांनी केली ‘या’ स्टार्टअपमध्ये 50% गुंतवणूक

संचालक मंडळाने युनिव्‍हर्सिटीमध्‍ये पाच शाळा स्‍थापित करण्‍यासाठी आवश्‍यक संकल्‍पांना देखील मंजूरी दिली. 
१. आयएफआयएम बिझनेस स्‍कूल – भारताचे सहावे एएससीएसबी मान्‍यताकृत बी-स्‍कूल आणि भारतातील अव्‍वल ३० बिझनेस स्‍कूलमध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या स्‍कूलचे दुसरे कॅम्‍पस बीबीए, बीकॉम व एमबीए ४.० अभ्‍यासक्रम देणार 
२. इन्‍फोस स्‍कूल ऑफ डेटा सायन्‍स – डेटा सायन्‍स व आर्टिफिशियल इंटेलिजन्‍समध्‍ये कॉर्पोरेट प्रशिक्षण देणारी भारताची आघाडीची कंपनी इन्‍फोससोबत शैक्षणिक भागीदारीअंतर्गत स्‍थापित करण्‍यात आलेली डेटा सायन्‍सची अधिकृत शैक्षणिक संस्‍था. ही शाळा बीएससी इन डेटा सायन्‍स, एमएससी इन डेटा अॅनालिटिक्‍स, बीई इन आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स आणि एमटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स असे कोर्सेस देईल.
३. विजयभूमी स्‍कूल ऑफ लॉ – बीसीआय प्रमाणित शाळा ५-वर्ष एकीकृत बीबीए-एलएलबी प्रोग्राम देणार 
४. विजयभूमी स्‍कूल ऑफ डिझाइन – आधुनिक डिझाइन स्‍कूल बी डीईएस इन कम्‍युनिकेशन डिझाइन आणि एम डीईएस इन कम्‍युनिकेशन डिझाइन कोर्सेस देणार 
५. विजयभूमी स्‍कूल ऑफ आर्टस् अॅण्‍ड ह्युमानिटीज बिझनेस, इकोनॉमिक्‍स व लीगल स्‍टडीजमधील बीए व बीएलए पदवी शिक्षण देणार 

यावेळी विजयभूमी युनिव्‍हर्सिटीचे अध्‍यक्ष म्‍हणून कार्यभार स्‍वीकारलेल्या  संजय पातोडे यांनी सांगितले की,  नियुक्‍त करण्‍यात आलेले युनिव्‍हर्सिटी अधिकारी गेल्‍या दशकभरापासून माझ्यासोबत सहयोगाने काम करत दर्जेदार शैक्षणिक संस्‍था निर्माण करण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहेत. व्‍यक्‍ती, समाज व देशाला समृद्धता, आनंद व प्रगतीच्‍या दिशेने घेऊन जाण्‍याच्‍या उद्देशाने भारताची पहिली उदारमतवादी व्‍यावसायिक युनिव्‍हर्सिटी निर्माण करण्‍यासाठी त्‍यांच्‍यासोबत कार्य सुरू ठेवणे हे माझे सौभाग्‍य आहे. युनिव्‍हर्सिटी विद्यार्थ्‍यांना जटिलता, वैविध्‍यता व परिवर्तनाचा सामना करण्‍याकरिता सुसज्‍ज करण्‍यासाठी, तसेच त्‍यांना डिझाइन विचारवंत, विशेषज्ञ, प्रामाणिक, जबाबदार व स्‍वयं-नियामक बनण्‍यामध्‍ये सक्षम करण्‍यासाठी लिबरल आर्टस् अभ्‍यासक्रमाचा व्‍यावसायिक शिक्षणामध्‍ये समावेश करेल.


ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here