मुंबई :
रक्षाबंधन जवळ आले आहे. बहीण मायेने भावाच्या मनगटावर राखी बांधत त्याला मिठाई भरवते. भाऊ तिला भेटवस्तू देण्यापूर्वी कशाप्रकारे तिची मस्करी करतो? हे क्षण आठवतात ना! करिअर्स किंवा विवाह व वेगळे शहर वा वेगळा देश यांसारख्या घटनांमुळे रक्षाबंधन पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा उत्साह कमी होत नाही. सध्या सर्वत्र पसरलेली कोविड-१९ महामारी देखील रक्षाबंधन सण साजरा करण्यापासून रोखू शकत नाही. यासाठी मिरची डॉट कॉमने पुढाकार घेतला असून त्यांच्या माध्यमातून आता ऑनलाईन रक्षाबंधन साजरे करता येणार असून सोबतच बहिणीची राखी दूर असलेल्या भावापर्यंत आणि भावाने दिलेली भेटवस्तू बहिणीपर्यत देखील मिरची डॉट कॉम पोहोचती करणार आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी ‘प्रोटेक्ट इंडिया चळवळ’
या विशेष राखी गिफ्ट बॉक्सेसच्या सादरीकरणाबाबत बोलताना मिरची डॉट कॉमच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्णिमा मितल म्हणाल्या, ”आमची या अद्वितीय वैयक्तिकृत राखी गिफ्ट बॉक्सेसच्या माध्यमातून बहिण-भावामधील पवित्र नात्याला प्रशंसित करण्याची इच्छा होती. काळ कदाचित बदलला असेल, पण बहिण-भावामधील प्रेम कधीच बदलणार नाही किंवा कोमेजून जाणार नाही. सध्याची महामारी देखील पारंपारिक पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्याला रोखू शकत नाही. मिरची डॉट कॉमने सादर केलेल्या वैयक्तिकृत राखी गिफ्ट बॉक्सेससह आम्हाला विश्वास आहे की, प्रत्येक कुटुंब यंदाचा रक्षाबंधन सण उत्साहाने व आनंदाने साजरा करेल.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…