सेन्सेक्स, निफ्टी सलग दुस-या दिवशी तेजीत

nifty
830763926

मुंबई:
जबरदस्त पकड घेत मंगळवारी सेन्सेक्स ३७१ अंकांनी वाढला. १.१७ टक्क्यांची वृद्धी घेत तो क्लोझिंग बेलच्या वेळी ३२,११४ अंकांवर होता. तर दुसरीकडे (nifty) निफ्टीतही कोरोनाची पकड कमी होताना दिसली आणि सलग दुस-या दिवशी बेंचमार्क निर्देशांकांनी प्रगती केली. एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की कोरोना व्हायरसनंतर पहिल्यांदाच सेन्सेक्सने ३२,००० अंकांची पातळी ओलांडली. तर (nifty) निफ्टीनेही एक टक्क्याची वाढ नोंदवत ९,३८० अंकांपर्यंत झेप घेतली.
जवळपास सर्वच बँकिंग स्टॉकनी सकारात्मक दिवस अनुभवला. या लाटेचे नेतृत्व इंडसइंड बँकेने केले. हा स्टॉक कालच्या -७% वाढीनंतर आज १४.८९ % दराने वाढला. निफ्टी (nifty) बँकेने आरबीएल बँक, अॅक्सिस बँक आणि बंधन बँकेसारख्या स्टॉक्सह व्यापार करत २.९४ % ची वृद्धी नोंदवली. एचडीएफसी बँक, आयडीएफसी बँक आणि वायइएस बँकेनेही सब-१% प्रगती नोंदवली.

पुन्हा दरात कमकुवतपणा आल्याने कच्च्या तेलाला मात्र दिलासा मिळाला नाही. या मार्केटमध्ये आधीच अतिरिक्त पुरवठा झालेला आहे. जागतिक पातळीवरील साठवण क्षमताही वेगाने संपत आहे. तसेच लवकरच मागणी वाढण्याची शक्यताही धूसर आहे. कच्च्या तेलाचे दर जवळपास ४ ते २० टक्क्यांनी घसरले. तथापि, भारतीय ओएमसीला विकासाचे पाठबळ मिळत आहे. ही प्रेरणा उशीराने मिळत असून आज प्रमुख ओएमसींच्या नफ्यात मोठी वाढ झाली. ऑइल इंडियाने २.३८ टक्के तर एचपीसीएल आणि बीपीसीएलने अनुक्रमे १.५४ टक्के आणि १.१३ टक्के वृद्धी नोंदवली. अदानी गॅसनेही ६.०७ टक्क्यांची प्रगती केली.
nifty
सोन्याला आली पुन्हा लकाकी…

सर्व प्रमुख फार्मास्युटिकल शेअर्स आज रेडझोनमध्ये ट्रेडिंग करताना दिसून आले. कारण गुंतवणूकदारांनी त्यांचा नफा काढून घेतला. निफ्टी फार्मात सर्वत्र घसरण दिसून आली, कुठेही नफा दिसला नाही. लुपिनला सर्वाधिक ४.७३ % चा फटका बसला असून त्यानंतर सन फार्माने ३.२६% आणि बायकॉनला ३.०७% एवढे नुकसान झाले. एसअँडपी बीएसई हेल्थकेअर मध्ये पॅनाशिआ बायोटेक ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठून १४.६७% वृद्धी नोंदवलली. या स्टॉकने ४ दिवसांमध्येच ६४%ची वाढ घेतली. बीएसई लाभार्थ्यांमध्येही मंगलम ड्रग्ज आणि सुवे लाइफ सायन्सेससह काही परफॉर्मर्सचा समावेश आहे. याउलट अलेंबिक फार्मा, व्हिव्हिमेड लॅब आणि ग्लेनमार्क फार्मा यांच्यासह उशीरा वितरित झालेल्या इतर स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना नफा मिळवताना पाहिले.
बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी एफएमसीजी निर्देशांकातही प्रत्येकी १ टक्क्याची घट झाली. नेेस्ले इंडिया २.१५ टक्क्यांनी घसरला तर कोलगेट पामोलिव्ह ३.३१ टक्क्यांनी घसरला. ब्रिटानिया आणि एचयूएलसारख्या इतर एफएमसीजी कंपन्यांमध्येही अनुक्रमे १.५१ आणि १.३० टक्क्यांची घट दिसून आली. याउलट एव्हरेडी इंडस्ट्रीज, व्हेनकीज आणि टाटा कॉफीने ४ ते ५ टक्क्यांदरम्यान नफा कमावला.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here