शेअर बाजारातील तेजी कायम

मुंबई :
आज सलग पाचव्या दिवशी एसअँडपी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी५० निर्देशांक हिरव्या रंगात दिसून आले. कारण बँकिंग स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना आकर्षून घेतले. जागतिक क्रमवारी संस्था मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने भारतीय गुंतवणूकदारांचे रेटिंग डाउन ग्रेड केले असले तरी यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झाला नाही.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की सेन्सेक्स ५२२.०१ अंक किंवा १.५७ टक्क्यांनी वाढून ३३,८२५.५३ अंकांवर बंद झाला. निफ्टी १५२.९५ अंक किंवा १.५६ टक्के वाढून ९९७९.१० अंकांवर बंद झाला. निफ्टीने संपूर्ण दिवस ९९०० ची पातळी कायम ठेवली. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये बेंचमार्कने ९ टक्क्यांपेक्षा जास्त उंची गाठली. निफ्टी एफएमसीडी इंडेक्स वगळता एनएसईतील सर्व निर्देशांक सकारात्मक स्थितीत बंद झाले. निफ्टी रिअॅलिटी इंडेक्स 5 टक्क्यांनी वधारून आजच्या दिवसातील तो सर्वाधिक नफा कमावणारा निर्देशांक ठरला.

लॉकडाउन शिथिल झाल्याने बाजारात वाढ


टॉप मार्केट गेनर्स आणि लूझर्स: 
आजच्या दिवसातील टॉप मार्केट गेनर्समध्ये बजाज फिनसर्व्ह (९.५१%), बजाज फायनान्स (८.१५%), झी एंटरटेनमेंट (९.०६%), कोटक महिंद्रा बँक (७.६९%) आणि टाटा मोटर्स (७.३७%) यांचा समावेश झाला. तर आजच्या व्यापारातील टॉप लूझर्समध्ये कोल इंडिया (३.३०%), आयटीसी (१.२७%), मारुती सुझूकी (१.८७%), बीपीसीएल (१.३९%) आणि डॉ. रेड्‌डीज लॅब्स (१.२०%) यांचा समावेश झाला.

कच्चे तेल:
या आठवड्यानंतर प्रमुख तेल उत्पादक देशांदरम्यानची व्हर्चुअल बैठक निश्चित झाली असून उत्पादनातील मोठी कपात आणखी काही काल सुरूच ठेवायची की नाही, हे ठरवले जाईल. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या.

भारतीय रुपया:
देशांतर्गत इक्विटीमध्ये विक्री कायम राहिल्यामुळे भारतीय रुपया 18 पैशांनी वाढून 75.36 प्रति डॉलरपर्यंत पोहोचला.

जागतिक बाजार:
जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणेचअया आशेने जागतिक स्तरावरील स्टॉकदेखील वाढले. मागील तीन महिन्यातील सर्वोच्च पातळी गाठत आशियात निक्केई १.२ टक्क्यांनी वाढले. युरोपियन स्टॉक मार्केटदेखील सकारात्मक स्थितीत बंद झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here