‘सिल्वर लेक’ची ‘जिओ’मध्ये पुन्हा गुंतवणूक 

​नवी दिल्ली :
3 मे रोजी सिल्वर लेकने जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 5,656 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता पुन्हा सिल्वर लेकने जिओमध्ये अतिरिक्त 4,546 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचं जाहीर केलं आहे.​ यामुळे जीओमध्ये आता सिल्वरलेकची २ टक्के भागीदारी झाली आहे. ​त्याचवेळेला ​अबूधाबीच्या ‘मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी’नेही जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक ​करत, जिओमध्ये 1.85 टक्के हिस्सेदारी खरेदी केली. 
दरम्यान, ​या एका महिन्यात दोनवेळा केलेल्या 10,202.55 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह सिल्वर लेककडे जिओची हिस्सेदारी 1.15 टक्क्यांहून वाढून 2.08 टक्के झाली आहे. शुक्रवारी सिल्वर लेककडून या गुंतवणूकीबाबत माहिती देण्यात आली. ​
‘जनरल अटलांटिक’ची ‘जिओ’मध्ये गुंतवणूक 
silver lake
यापूर्वी सिल्वर लेकने अलीबाबा ग्रुप, एअरबीएनबी, डेल टेक्नॉलॉजी, अँट फायनान्शियल , अल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटर यांसारख्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. यासोबतच गेल्या सहा आठवड्यांमधला हा जिओचा सातवा मोठा करार ठरला. या गुंतवणुकीसह गेल्या सहा आठवड्यांमध्ये कंपनीत जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून एकूण 92,202.15 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यापूर्वी जिओ प्‍लॅटफॉर्म्‍समध्ये सिल्‍वर लेकव्यतिरिक्त फेसबुक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआर आणि मुबादला या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.​​

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here