सिल्वर लेकची रिलायन्समध्ये 5655 कोटींची गुंतवणूक 

silver lake

नवी दिल्ली :
अमेरिकेतील खाजगी कंपनी सिल्वर लेक (silver lake) जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ५ हजार ६५५.७५ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ४.९० लाख कोटी रुपये मूल्य असलेले १.१५ टक्के शेअर्स ही कंपनी विकत घेणार आहे. फेसबुकने जिओमध्ये जवळपास ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर दोनच आठवड्यात सिल्वर लेकही (silver lake) गुंतवणूक करणार असल्याचं रिलायन्सने सांगितलं आहे.
सिल्वर लेक जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ५ हजार ६५५.७५ कोटी रुपये गुंतवणार असल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स जिओ जाहीर करत आहे. या गुंतवणुकीचं मूल्य ४.९० लाख कोटी रुपये असेल, असं जिओ आणि रिलायन्स इंडस्ट्रीजकडून संयुक्त पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलं. रिलायन्स जिओ ही रिलायन्स जिओच्या मालकीची कंपनी आहे. फेसबुकनेही नुकतीच जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. जिओ इन्फोकॉमचे जवळपास ३८.८ कोटी सबस्क्राईबर्स आहेत. कंपनीवर मालकी ही रिलायन्सचीच कायम राहणार आहे.
silver lake
फेसबुकची जिओत 43574 कोटींची गुंतवणूक
काय करणार जिओ, फेसबुकच्या गुंतवणूकीचे?

सिल्वर लेक (silver lake) ही तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी आहे. आम्ही भारतीय तंत्रज्ञान समुदायासाठी या जागतिक कंपनीकडून शिकण्यासाठी उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी दिली.
जिओ प्लॅटफॉर्म्सने छोटे उद्योग आणि जनतेला कमी दरात डिजीटल तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी असामान्य काम केलं आहे. बाजारात त्यांच्याकडे असलेली ताकद ही प्रचंड आहे, अशी प्रतिक्रिया सिल्वर लेकचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय भागीदार एगन डर्बन यांनी दिली. दरम्यान, या कराराला अजून संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी मिळणं बाकी आहे.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here