सिंगापूर एयरलाईन्स म्हणतेय, ‘फ्लाय विथ केअर’

मुंबई :
सध्याच्या कोविड-१९ आरोग्य आणीबाणीमुळे प्रवासावर सर्वप्रकारचे निर्बंध आले आहेत. जगातील बहुतांश देशांनी टाळेबंदी करून कोविड -१९ वर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता कित्येक देशांनी राज्यांतर्गत, देशांतर्गत तसेच राष्ट्रांतर्गत दळणवळण सेवा सुरु केली आहे. सिंगापूर एअरलाईनने देखील आपली सेवा सुरु केली असून, कोविड -१९ नंतरचा प्रवास अनुभव एकूणच बदललेला असणार हे संपूर्णतः लक्षात घेत आपल्या सगळ्या सुविधाममध्ये सिंगापूर एअरलाईनने आवश्यक ते बदल केल्याचे माध्यमांना सांगितले आहे. 

सिंगापूर एअरलाईनच्यावतीने विमानांमध्ये सरकार तथा प्रवाशांच्या सूचनेनुसार आणि डॉक्टर्सच्या मार्गदर्शानुसार आरोग्यदायी विविध बदल केले असून, प्रवाशांना अत्यंत सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे. त्याचप्रमाणे विमानात बसण्यापूर्वीच इ-ब्रोशर्स प्रवाशांना देण्यात येणार आहेत. तसेच विमानात बसण्यापूर्वी, बसल्यानंतर आणि उतरताना आरोग्य विषयक सूचना देण्यात येत आहेत. विमानात तथा विमानतळावर हात धुण्यासाठी स्वंयचलित नळाची व्यवस्था केली असून, अल्ट्रा व्हायोलेट लाईट क्लिनिंग पद्धतदेखील आजमवण्यात येणार आहे. प्रवाशी किट मध्ये सर्जिकल मास्क, अँटी बॅक्टेरियल हॅन्ड वाईप, सॅनिटायझर यांचाही समावेश करण्यात आल्याचे सांगितले आहे.
सिंगापूर आले भारतीयांच्या घरी…

कंपनीच्यावतीने सामाजिक कार्याचा भाग म्हणून प्रवाशांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे सांगत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोह चून फोंग यांनी नमूद केले कि, प्रवाशांची सुरक्षितता हे आमचे आद्य प्राध्यान्य आहे. त्यामुळे त्यांना सर्वार्थाने सुरक्षित प्रवास अनुभव देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे डिजिटल माध्यमातून विविध पद्धतीने प्रवाशांना सेवा पुरवण्यासाठीही आम्ही पुढाकार घेत आहोत.  

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here