​’अशा’ प्रकारे सुरु करा ऑफिसचा कॅफेटेरिया​

​मुंबई :
भारतातील मोठ्या व्यवसाय हळूहळू आपल्या कामकाजाची सुरुवात करीत आहेत. कर्मचा-यांच्या वापरासाठी कॅफेटेरिया पुन्हा घडण्याची तयारी सुरु आहे. अशा वेळी सोशल डिस्टान्सिंगसाठीचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. हंगरबॉक्स या भारतातील संस्थात्मक फूड टेक कंपनीने एफएसएसएआय (अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरण ) आणि डब्ल्यूएचओ मार्गदर्शक सूचनांवर तसेच भारत सरकारच्या आरोग्य सेतू अॅपमध्ये दिलेल्या सूचनांच्या आधारे ‘कोव्हिड-१९ सेफ’ हे एक उपयुक्त समाधान सादर केले आहे ज्याचा वापर कॅफेटेरिया चालविताना करता येईल.
‘खाताबुक’ने उभारले ४५४ कोटी

हंगरबॉक्सचे सीईओ आणि सहसंस्थापक संदीपन मि​​त्रा म्हणाले, ‘ हंगर बॉक्सचे कोव्हिड-१९ सेफ हे सोल्युशन पाच आयामी दृष्टीकोनाचे अनुसरण करते. यात तंत्रज्ञान, यूझर कनेक्ट आणि कम्युनिकेशन, डब्ल्यूएचओ आधारीत सुपरवायझर ट्रेनिंग आणि स्वयंपाक घर तसेच कॅफेटेरियाचे संचालनाचे प्रोटोकॉल यांचा समावेश आहे. या प्रक्रियेशी संबंधित कर्मचा-यांची काटेकोर तपासणी आणि कॅफेटेरियातील प्रक्रियांना ३६० अंशातून तंत्रज्ञान प्रणित देखरेखीचाही यात समावेश आहे.’
मित्रा पुढे म्हणाले, ग्राहकांसोबत काम करून या सोल्युशनची सहनिर्मिती केली आहे. जेणेकरून एफएसएसएआयच्या नव्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कॅफेतील गर्दी कमी केली जाऊ शकेल. ज्यादा सुरक्षा उपाय आणि ऑपरेशनल प्रक्रिया लागू केल्या जातील. जेणेकरून खाद्य पदार्थ प्रदुषित होणे आणि कोव्हिड-१९ संसर्गाची जोखीम कमीत कमी केली जाऊ शकेल.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here