सलग दुस-या दिवशी शेअर बाजाराचे नुकसान

nifty

मुंबई :
सलग दुस-या दिवशी मंगळवारी एसअँडपी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांक रेड झोनमध्ये दिसून आला. मात्र व्यापाराच्या शेवटच्या तासात शॉर्ट कव्हरिंगमुळे निर्देशांकाने काही नुकसान भरू काढले. ३० शेअर सेन्सेक्स १९०.१० अंक किंवा ०.६०% नी घसरुन ३१,३७१.१२ अंकांवर थांबला. तर निफ्टी ५० ३१.३५ अंक किंवा ०.३५% नी घसरून ९,२०७.८५ अंकांवर थांबला.
निफ्टी मिडिया निर्देशांकात १.७ टक्क्यांच्या वृद्धीसह एनएसईतील ११ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी सात निर्देशांक वधारले. तथापि, बँकिंग आणि तेल क्षेत्रातील स्टॉक्सवर आज विक्रीचा दबाव दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकिंगमुळे आरआयएलची शेअर प्राइज ६ टक्क्यांनी घसरून ती १४.८६.४५ वर बंद झाली. उद्या स्टॉक एक्स-राइटमध्ये रुपांतरीत होईल. कंपनी ५३,१०० कोटी रुपयांचे १:१५ राइट्स देईल. १४ मे रोजी प्रति शेअरची किंमत १,२५७ रुपये आहे.

आत्मनिर्भर भारत : MSMEना केंद्राचा मोठा दिलासा
share market
बँकिंग क्षेत्रावरील संकट कायम:
निफ्टी बँक मागील १८,९५०.४० अंकांवरून १८,७५१ अंकांवर सुरु झाली. ०.४६ टक्क्यांची घसरण घेत ती १८८६२.८५ अंकांवर थांबली. खासगी क्षेत्रातील बँका मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या बँकांसह मार्केटच्या बाहेर पडल्या. कोटक महिंद्रा बँकेचे शेअर ३०.५० रुपयांनी घसरून १,१५७.९५ रुपये किंवा २.५७% नी घसरले. जपानची विमा प्रमुक निप्पॉन लाइफ इंडसइंड बँकेत धोरणात्मक गुंतवणूक करण्याच्या विचारात असल्याच्या वृत्तानंतर या बँकेची कामगिरी चांगली झाली. तिचे शेअर्स ३ टक्क्यांनी वाढले.

फार्मास्युटिकल क्षेत्राने प्रॉफिट बुकिंग अनुभवले:
पिरामल एंटरप्रायझेसने २५.१० रुपये किंवा २.६९%ची घसरण घेत ९०६.५० रुपयांवर विश्रांती घेतली. इंट्रा डे सेशनमध्ये मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही १७०२.५९ कोटी रुपयांचा तोटा झाल्याने शेअर १४ टक्क्यांनी खाली घसरला. सिपला लिमिटेडनेही आज कमकुवतपणा दाखवला. या मूल्यात २.६५% घसरण होऊन ५७०.५० रुपयांवर स्टॉक बंद झाला.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here