वित्तीय आणि आयटी स्टॉक्सची दमदार कामगिरी

मुंबई :
आजच्या व्यापारी सत्रात वित्तीय आणि आयटी स्टॉक्सच्या नेतृत्वात भारतीय बाजाराने वद्धी दर्शवली. निफ्टीने ०.८९% किंवा ९८.५० अंकांची वृद्धी करत तो ११,२००.१५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.९६% किंवा ३६२.१२ अंकांची वाढ घेतली, तो ३८,०२५.४५ अंकांवर स्थिरावला. आझ जवळपास १५६७ शेअर्सनी वृद्धी दर्शवली, १०५६ शेअर्स घसरले तर १६७ शेअर्स स्थिर राहिले.
एंजल ब्रोकिंग लिमिटेचे प्रमुख सल्लागार अमरदेव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात इन्फोसिस (२.८९%), बजाज फायनान्स (२.५४%), गेल (२.६३%), एचसीएल टेक (२.१८%) आणि युपीएल (२.५१%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. श्री सिमेंट्स (१.१५%), आयशर मोटर्स (१.२९%), अदानी पोर्ट्स (०.९३%), एमअँडएम (०.५७%) आणि भारती एअरटेल (०.३५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी, मेटल, एफएमसीजी आणि फार्मा सेक्टर्सनी १ टक्क्यापेक्षा जास्त वृद्धी दर्शवली. बीएसई मिडकॅप ०.७७% नी वाढले तर स्मॉलकॅप ०.९९% नी वाढले.

ब्लू स्टार लिमिटेड: कंपनीने २० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा दर्शवला तर कंपनीचा महसूल ६० टक्क्यांनी घसरला. तरीही कंपनीचे स्टॉक्स ४.४०% नी वाढले व त्यांनी ५०५.०० रुपयांवर व्यापार केला.
येस बँक: एलआयसीने या संकटातील खासगी बँकेचे शेअर्स विकत घेतल्यानंतर येस बँक लिमिटेडचे शेअर्स ४.६७% नी वाढले व त्यांनी १३.४५ रुपयांवर व्यापार केला.
हिंदुस्थान झिंक लिमिटेड: सिटी या जागतिक रिसर्च फर्मने कंपनीच्या स्टॉकवर खरेदीचा निर्णय कायम ठेवला. त्याचे लक्ष्यित मूल्य प्रति शेअर २४० रुपये एवढे वाढवले. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ८.३२% नी वाढले व त्यांनी २३६.९५ रुपयांवर व्यापार केला.
लुपिन लिमिटेड: कंपनीचा कॉनकॉर्ड बायोटेकशी करार झाल्यानंतर लुपिन लिमिटेडचे शेअर्स ०.८१% नी वाढले व त्यांनी ९३५.५० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने मायकोफेनोलेट मोफेटिल टॅब्लेटसाठी अमेरिकी एफडीएची मान्यता मिळाल्याचे घोषित केले.
आणि आता आली ऐटबाज ‘जावा फॉर्टी-टू BS-VI’

भारतीय रुपया: भारतीय रुपयाने आज देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदीचा ट्रेंड अनुभवला. परिणामी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.८७ रुपयांचे वृद्धींगत मूल्य गाठले. आरबीआयने रेपो दर ४% वर स्थिर ठेवण्याचे ठरवले, त्यानंतर बाजारात हा ट्रेंड दिसून आला.
जागतिक बाजार: आशियाई तसेच युरोपियन बाजार आजच्या व्यापारी सत्रात कमकुवत दिसून आला. नॅसडॅकच्या शेअर्समध्ये ०.५२% नी वृद्धी झाली. हे वगळता सर्व प्रमुख बाजार निर्देशांक घसरले. एफटीएसई १०० चे शेअर्स १.९७%, एफटीएसई एमआयबीचे शेअर्स १.६०%, निक्केई २२५ चे शेअर्स ०.४३% नी घसरले. तर हँगसेंगचे शेअर्स ०.६०% नी घसरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here