विद्यार्थ्यांनी जमा केले गरिबांसाठी ५० लाख

मुंबई :
येथील विविध शाळा व महाविद्यालयांमधील जवळपास ८० विद्यार्थ्‍यांनी अक्षय पात्र फाऊंडेशनच्‍या राज्‍यातील कोविड-१९ फूड रिलीफ प्रयत्‍नांना साह्य करण्‍याकरिता FuelaDream.com वरील ‘अल्‍फा अर्बन प्रोजेक्‍ट’ बॅनरअंतर्गत क्राऊडफंडिंगच्‍या माध्‍यमातून ५०.७२ लाख रूपयांचा निधी उभारला. या फंडांमुळे अक्षय पात्र फाऊंडेशनला महाराष्‍ट्रातील विविध ठिकाणी असलेले रोजंदारी मजूर, स्‍थलांतरित कामगार व वंचितांना २ लाखांहून अधिक भोजन सुविधा देण्‍यामध्‍ये मदत होईल.
विद्यार्थ्‍यांनी ऑनलाइन क्राऊडफंडिंग वेबसाइट FuelaDream.com वर २१ दिवसांमध्‍ये हा निधी उभारला. त्‍यांचे वैयक्तिकरित्‍या अंदाजे ५६,००० रूपये निधी उभारण्‍याचे ध्‍येय होते, ज्‍यामधून २८०० भोजन देता येतील. तसेच त्‍यांचे एकत्रितपणे ४५.५ लाख रूपये उभारण्‍याचे ध्‍येय होते, जे त्‍यांनी पार केले आहे. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे देशभरात पूर्णपणे लॉकडाऊनची स्थिती असताना अक्षय पात्र देशभरातील वंचित समुदायांना भोजन सुविधा देत सरकारच्‍या मदतकार्यांना साह्य करत आहे. गेल्‍या २ महिन्‍यांमध्‍ये फाऊंडेशन आणि तिच्‍या सहाय्यक संस्‍थांनी सहयोगाने देशभरातील वंचित लोकांना ५६ दशलक्षहून अधिक भोजन सुविधा दिल्‍या आहेत. यामध्‍ये २९ दशलक्षहून अधिक ताजे शिजवलेले भोजन आणि ६३९,०३९ फूड रिलीफ किट्सचा समावेश आहे.
आता किराणा दुकाने येणार ‘ऑनलाईन’

अक्षय पात्रचे सीएमओ संदीप तलवार म्‍हणाले, ”आम्‍ही महाराष्‍ट्रातील आमच्‍या कोविड-१९ रिलीफ फिडिंग प्रयत्‍नांना क्राऊंड फंडिंग मोहिमेच्‍या माध्‍यमातून साह्य करणा-या विद्यार्थ्‍यांचे आभार मानतो. त्‍यांनी आमच्‍या प्रयत्‍नांसाठी निधी उभारण्‍यामध्‍ये लक्षणीय कामगिरी केली आहे आणि सोबतच जागरूकता निर्माण करण्‍यामध्‍ये देखील मदत केली आहे. या कठीण काळामध्‍ये गरजूंना मदतीचा हात देण्‍यासाठी पुढाकार घेत या तरूणांनी आम्‍हाला आशेचा किरण देत खात्री दिली आहे की, आपल्‍या देशाचे भविष्‍य सुरक्षित हातांमध्‍ये आहे.’
FuelaDream.com चे संस्‍थापक रंगनाथ थोटा म्‍हणाले, ‘विद्यार्थ्‍यांनी क्राऊडफंडिंगची संकल्‍पना सांगिल्‍यांनंतर त्‍वरित संकल्‍पना आत्‍मसात केली. त्‍यानंतर त्‍यांनी या संकल्‍पनेमधील शक्‍तीचा उपयोग करत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. कोविड-१९ दरम्‍यान विद्यार्थ्‍यांना मोठा बदल घडवून आणण्‍यासाठी प्रयत्‍न करताना पाहून खूपच चांगले वाटत आहे.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here