लॉकडाउनमध्ये विद्यार्थी घेताहेत आरोग्याची काळजी

students, brainly

मुंबई :
कोव्हिड-१९च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे. कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता विद्यार्थी स्वतःच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेत असल्याचे जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थी (Students), पालक व शिक्षकांसाठीची जगातील सर्वात मोठी ऑनलाइन कम्युनिटी ब्रेनलीने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.
भारतात २२१७ विद्यार्थ्यांनी या सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवला. त्यात ब्रेनलीला आढळले की, कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे ८४.६% विद्यार्थी त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी सध्या जास्त वेळ देत आहेत. तसेच घरी असल्यामुळे ६४.३%विद्यार्थी (Students) म्हणाले की, त्यांनी आता ते आरोग्याच्या नव्या वेळापत्रकानुसार वागण्याचा प्रयत्न करत आहेत.
सर्व्हेच्या निष्कर्षात असे आढळून आले की, आरोग्यदायी दिनचर्या आणि जीवनशैली राखण्यासाठी ४०.८% विद्यार्थी (Students)त्यांच्या आहाराची काळजी घेत असून सकस आहार घेण्यावर त्यांचा भर आहे. तसेच ३५.६%विद्यार्थी दररोज व्यायाम करत आहेत. एकूण सर्वत्र चांगले व्हावे, ही जाणीव ठेवत ९०.५% विद्यार्थ्यांना शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यही उत्तम राहिले पाहिजे, असे वाटते. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ७५.१% विद्यार्थ्यांनी त्यांचे आरोग्य राखण्याचे, स्वच्छता ठेवण्याचे, भविष्यात निरोगी राहण्याचे वचन दिले आहे.
students, brainly
‘सीपीटी’ ठरणार कोरोना रुग्णांसाठी नवी आशा ?

ब्रेनलीचे सीईओ मिशल बोर्कोव्हस्की म्हणाले, ‘ऑनलाइन लर्निंग करणाऱ्या मुलांना इतर गोष्टी करण्यासाठी बराच वेळ मिळतो. विद्यार्थ्यांचा शाळेत जाणे-येणे करण्यासाठीचा वेळ वाचतो, त्यामुळे आरोग्यदायी क्रियांसाठी मुलांना बराच वेळ शिल्लक राहत आहे, हे एक अतिशय चांगले चित्र या सर्व्हेतून समोर आले आहे. लॉकडाउनच्या काळात व्यायामाचे नवे वेळापत्रक, आरोग्यदायी जीवनशैली, आहाराच्या सवयी, वेळेचा उत्तम वापर करणे आदी गोष्टी स्वीकारण्याची विद्यार्थ्यांची तयारी आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.’

अर्थ जगताच्या ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here