‘सुगुणा’ आणणार ‘ड’ जीवनसत्त्वांची अंडी

मुंबई :
भारताचा सर्वात मोठा पोल्‍ट्री समूह सुगुणा फूड्सने जीवनसत्त्व ड संपन्‍न अंड्यांच्‍या उत्‍पादनामध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा केली आहे. देशातील प्रमुख सुगुणा डेली फ्रेश आऊटलेट्स व इतर सुपरमार्केट्समध्‍ये उपलब्‍ध असलेली ही सुपर स्‍पेशालिटी अंडी एकाच अंड्यामधून दररोज ८२ टक्‍के जीवनसत्त्व ड देतात. जीवनसत्त्व ड कोविड-१९ मुळे सध्‍या निर्माण झालेल्‍या आरोग्‍यविषयक संकटामध्‍ये महत्त्वाचा घटक आहे.  
मार्च महिन्‍यापासून सुगुणा फूड्सने देशभरात जीवनसत्त्व ड संपन्‍न अंड्यांच्‍या उत्‍पादनामध्‍ये लक्षणीयरित्‍या वाढ केली आहे. पोषणावर लक्ष केंद्रित करणा-या प्रबळ आरअॅण्‍डडी टीमसह सुगुणा पौष्टिक जीवनसत्त्व ड संपन्‍न अंड्यांचे उत्‍पादन करते. जीवनसत्त्व ड सर्वात महाग व सर्वात आरोग्‍यदायी प्रथिन स्रोत आहे, जे सर्व वयोगटातील आणि आजारी असलेल्‍या लोकांना संतुलित आहार व आरोग्‍यदायी जीवनशैली राखण्‍यामध्‍ये मदत करते. 
शेतमालाला आधारभूत किंमतीच्या दीडपट दर

सुगुणा फूड्स प्रा. लि.चे कार्यकारी संचालक विग्‍नेश सौंदराराजन यांनी याबद्दल सांगितले, आम्‍ही आमच्‍या काही फार्म्‍सना बदलत तेथे जीवनसत्त्व ड संपन्‍न अंड्यांचे उत्‍पादन वाढवले आहे. जीवनसत्त्व ड शरीरासाठी आवश्‍यक असलेले जीवनसत्त्व आहे. आम्‍ही आमचे स्‍वत:चे उत्‍पादन वाढवण्‍याप्रती काम करत आहोत. 
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here