‘सनटेक’ने घेतली वसईत 50 एकर जमीन

Sunteck

मुंबई:
भारतातील अग्रगण्य लग्झरी विकासक सनटेक रिॲल्टी लिमिटेडने वसईतील (पश्चिम) उच्चभ्रू भागातील सुमारे ५० एकरांचा महत्त्वपूर्ण प्रकल्प संपादित केला आहे. लॉकडाउननंतरच्या काळात झालेल्या सर्वांत मोठ्या रिअल इस्टेट करारांपैकी हा एक आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) या महत्वपूर्ण प्रकल्पाची विकास संभाव्यता सुमारे ४५ लाख चौरस फूट एवढी आहे. या प्रकल्पाची पुढील ५-७ वर्षांत या ठिकाणाहून पाच हजार कोटी रुपये (५० अब्ज रुपये) मिळू शकतील असा अंदाज आहे.
वसईच्या (पश्चिम) हृदयस्थानी उभ्या असलेल्या या प्रकल्पाच्या स्थळावरून अरबी समुद्राचा खिळवून टाकणारा देखावा कोणत्याही अडथळ्याखेरीज दिसतो. एमएमआरमधील आगामी सुक्ष्म-बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलून टाकण्यास हा प्रकल्प सज्ज आहे. या स्थळाची कनेक्टिविटी उत्तम आहे. या प्रकल्पाच्या परिसरात अनेक संरचना प्रकल्प व मोठ्या सुविधा होऊ घातल्या आहेत.
येथेही सनटेक आपले यशस्वी धोरण अवलंबणार आहे आणि या स्थळाची अधिकाधिक क्षमता उपयोगात आणणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘सिग्नेचर आयलंड’, गोरेगावातील (पश्चिम) ओशिवारा डिस्ट्रिक्ट सेंटरमधील (ओडीसी) ‘सनटेकसिटी’ आणि नायगावमधील ‘सनटेकवर्ल्ड’ या सनटेकच्या ग्रोथ इंजिनप्रमाणे असलेल्या प्रकल्पांमध्ये ही महत्त्वाची भर पडणार आहे.

‘अपना पंप’ देणार कमी किंमतीत इंधन
Sunteck
सनटेक रिॲल्टी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कमल खेतान या प्रकल्पाबद्दल म्हणाले, “हा प्रकल्प म्हणजे आमच्या संशोधनाधारित मूल्यवर्धित संपादनांच्या तत्त्वज्ञानाचे परिपूर्ण उदाहरण आहे. हा प्रकल्प मुख्यत्वे मध्यम-उत्पन्न गटासाठी आहे. विशेषत: कोविड-१९ साथीनंतरच्या काळात निर्माण होणाऱ्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता हा प्रकल्प करणार आहे. यातील निवासी परिसर आजच्या आरामदायी जीवनशैलीला पूरक असेल आणि वर्क फ्रॉम होम या नवीन गरजेला अनुकूल असेल.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here