T-90 ची उपकरणे असणार ‘मेक इन इंडिया’  

नवी दिल्ली :
सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या मंजूरीनंतर, संरक्षण मंत्रालयाच्या खरेदी शाखेने आज भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) सोबत T-90 एस/एसके या रणगाड्यासाठी लागणाऱ्या 1,512 भूसुरुंगविरोधी उपकरणांच्या, अंदाजे 557 कोटी रुपये खरेदी संदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या केल्या. खरेदी करारानूसार, उत्पादनाचा 50 टक्के भाग स्वदेशात निर्मित असला पाहिजे.
पीएनबीची ग्रामीण भागात ‘कोविड सुरक्षा’

भूसुरुंग उद्धवस्त करण्यासाठी लागणारी उपकरणे भारतीय लष्कराच्या T-90 रणगाड्यांमध्ये बसवण्यात येणार आहेत, यामुळे रणगाड्यांची सुरुंगक्षेत्रातील वाहतूक सुलभ होईल. तसेच रणगाड्यांची गतीशीलता अनेक पटींनी वाढेल आणि भूसुरुंगाला बळी न पडता शत्रू प्रदेशात दूरपर्यंत जाता येईल. भूसुरुंग उद्धवस्त करण्यासाठी लागणारी 1,512 उपकरणे 2027 पर्यंत मिळतील, यामुळे लष्कराची युद्धक्षमता आणखी वाढेल.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here