मलेरिया, डेंग्यू पासून घ्या स्वतःची काळजी

Malaria day

मुंबई :
जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने गोदरेज समूहाने लोकांना सध्या सुरू असलेल्या कोव्हिड- 19 साथीदरम्यान मलेरिया (Malaria) डेंग्यु अशा कीटकांपासून होणाऱ्या आजारांविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रॅमनुसारा भारतात 2019 मध्ये मलेरियाच्या 3,34,693 केसेस दिसून आल्या होत्या. यावर्षी फेब्रुवारीमध्ये 19,980 केसेस नोंदल्या गेल्या आहेत. मे ते ऑगस्टदरम्यान मलेरियाच्या (Malaria) केसेसमध्ये जास्त वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. मलेरिया प्रतिबंधाची तयारी एप्रिलपासून सुरू होते. करोनाच्या केसेस 23,000 च्या पुढे गेल्या असताना सरकार आणि आरोग्य सेवा क्षेत्र त्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, सध्याची ही साथ लक्षात घेता भारत मलेरिया आणि डेंग्युला तोंड देण्यासाठी सज्ज नाही. मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेनेही कोव्हिड- 19 मुळे परिस्थिती गंभीर असतानाही मलेरियाविरोधातले प्रतिबंधात्मक उपाय सुरूच ठेवण्याचा सल्ला विविध देशांना दिला आहे.

गोदरेज समूहाने प्रशासनाला लोकांना घरच्या घरीच सक्षम करण्याची विनंती केली असून त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणत डासांपासून होणाऱ्या संभाव्य आजारांपासून सुरक्षित राहाण्याची विनंती केली आहे. सध्या लॉकडाउनमुळे केवळ जीवनावश्यक वस्तू विकल्या जात असून त्यात डासांपासून संरक्षण करणाऱ्या वस्तूंचा समावेश नाही. म्हणूनच डास प्रतिबंधात्मक उत्पादने, लिक्विड व्हेपोरायझर अशा वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या परिघाअंतर्गत आणणे आवश्यक आहे. यामुळे घरगुती कीटकनाशक उत्पादनांचा पुरवठा सुरळीत होऊन लॉकडाउन संपेपर्यंत नागरिकांना त्याची मदत होईल.
malaria
‘सीपीटी’ ठरणार कोरोना रुग्णांसाठी नवी आशा ?

‘एक उद्योगक्षेत्र या नात्याने आम्ही सरकार किंवा स्थानिक प्रशासन मलेरिया (Malaria) तसेच कोव्हिड- 19 परिस्थिती हाताळण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करतो व त्यांना पाठिंबा देतो. काही स्थानिक संघटनांनी आगामी पावसाळा लक्षात घेत काम सुरू केले आहे व त्यांच्याद्वारे अमलात आणले जात असलेले प्रतिबंधात्मक उपाय कीटकांपासून होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे नाहीत. घरगुती कीटकनाशके उदा मस्किटो रिपेलंट, कॉइल्स, मॅट्स, लिक्विड व्हेपोरायझर यांना दैनंदिन वापराच्या किराणा वस्तूंप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचा दर्जा देणे व ते किराणा दुकाने, औषधांची दुकाने, ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करणे यांमुळे ग्राहकाला आपले संरक्षण करण्यास मदत होईल. सुरळीत पुरवठा साखळी, उत्पादन आणि व्यापारी भागिदारांकडून कच्चा माल यांमुळ या क्षेत्राला वेळेवर मालाचे वितरण होण्यास मदत होईल हे वेगळे सांगायला नको. यासंदर्भात एचआयसीएने केलेली विनंती सरकारकडे विचाराधीन आहे,’ असे घरगुती कीटनाशक क्षेत्रातील औद्योगिक संघटना असलेल्या होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशनने (एचआयसीए) सचिव आणि संचालक जयंत देशपांडे म्हणाले.

​malaria​ वर डिजिटल फिल्म :​

समूहाने ईएमबीईडीकडे (एलिमिनेशन ऑफ मस्किटो बोर्न एंडेमिक डिसीजेस) लक्ष वेधण्यासाठी डिजिटल फिल्मही प्रदर्शित केली असून ही फिल्म 2030 पर्यंत भारत मलेरिया (Malaria) मुक्त करण्यासाठी तसेच मलेरियासारख्या कीटकांपासून पसरणाऱ्या आजारांमुळे होणारा मृत्यूचा दर कमी करण्यासाठी समूहाने हाती घेतलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ही फिल्म ईएमबीईडी स्वयंसेवक, आशा वर्कर्स आणि ग्रामीण आरोग्य सेवा पुरवठादारांची मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ येथील घराघरांतील प्रत्येकाचा कोव्हिड- 19 पासून बचाव करण्यातली आणि लोकांचे मलेरियापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना सज्ज करण्यातली महत्त्वाची भूमिका मांडणारी आहे.
डिजिटल फिल्म लिंक: https://youtu.be/yR9qAsw54PA 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here