टाटांनी केली ‘या’ स्टार्टअपमध्ये 50% गुंतवणूक

generic-aadhar

मुंबई:
टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी मुंबईतील १८ वर्षांच्या अर्जुन देशपांडे यांच्या औषधी तयार करणारी कंपनी जेनेरिकच आधारामध्ये ५० टक्के हिस्सा विकत घेतला आहे. ही कंपनी किरकोळ विक्रेत्यांना स्वस्तात औषधी विकते. टाटांनी हा हिस्सा किमतीमध्ये घेतला याचा खुलासा करण्यात आलेला नाही.देशपांडे यांनी दोन वर्षांपूर्वी आई- वडिलांकडून पैसे घेऊन व्यवसाय सुरू केला होता. देशपांडेंनी या व्यवहाराची पुष्टी केली असली तरी हा व्यवहार किमतीमध्ये झाला याचा खुलासा केलेला नाही. त्यांनी सांगितले की, रतन टाटा गेल्या ३-४ महिन्यांपासून त्यांच्या प्रस्तावावर गंभीर विचार करत होते. 

फेसबुकची जिओत 43574 कोटींची गुंतवणूक

जेनेरिकच आधारामध्ये सध्या ५५ कर्मचारी मुंबई, पुणे, बंगळुरू आणि ओडिशात सुमारे ३० रिटेलर या कंपनीशी संबंधित आहेत. कंपनीच्या ५५ कर्मचाऱ्यांमध्ये फार्मासिस्ट, आयटी अभियंते आणि मार्केटिंग व्यावसायिकांचा समावेश आहे. आमच्या व्यवसायाचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीत करायचा आहे. वर्षाच्या आत आमची योजना जेनेरिकच आधार अंतर्गत १००० फ्रॅन्चायझी औषधी दुकाने सुरू करायची आहेत, असे देशपांडे म्हणाले.

जेनेरिक आधाराचा पूर्ण प्रवास जाणून घ्या इथे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here